Headlines

उद्धव ठाकरेंना लोकांची ऍलर्जी असल्यामुळेच लोक सोडून गेले:त्यांनी काँग्रेसचे पाय धरले, त्यामुळे शिवसैनिकांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला- श्रीकांत शिंदे

उद्धव ठाकरे यांना लोकांची ऍलर्जी असल्यामुळेच आज त्यांच्यावर कुठल्यातरी मंगल कार्यालयात जाऊन सभा घेण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे हे आत्ता कुठे घराबाहेर पडले आहेत आणि बाहेर पडून लोकांना ‘गद्दार-गद्दार’ म्हणून हिणवत आहेत. मात्र, कालपर्यंत हेच लोक जेव्हा तुमच्यासोबत होते, तेव्हा ते चांगले होते आणि आता अचानक गद्दार कसे झाले? असा सवाल करत शिवसेना खासदार…

Read More

सांगली हादरली:अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा, झोपेतच मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीसह प्रियकरास अटक

प्रेमसंबंधात येणारा अडथळा दूर करण्यासाठी एका पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीत उघडकीस आली आहे. हत्येनंतर हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव रचून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र विश्रामबाग पोलिसांच्या सतर्कतेमुळे हत्येचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी पोलिसांनी मृत आनंदा सर्जे यांची पत्नी पल्लवी सर्जे आणि तिचा प्रियकर दीपक आजमाने…

Read More

प्रवाशांची पळवापळवी:200 मीटर नियमाची ऐशी- तैशी; थेट बसस्थानकाजवळच खासगी वाहतूक

येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. बसस्थानकाच्या २०० मीटर अंतराच्या आतूनच बेकायदेशीर खासगी वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) दररोज मोठा आर्थिक फटका बसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकारामागे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा थेट आरोप आता प्रवासी आणि जागरुक संघटनांकडून केला जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते सकाळी…

Read More

चिमणपुरी पिंपळे येथे विद्युत रोहित्र, वीज तारांची दुरवस्था:डीपीलगत तार तुटल्याने शेतकऱ्यांचा जीव धाेक्यात; पेरणीलाही अडचण‎

अमळनेर तालुक्यात पिंपळे परिसरात खरीप हंगामाची लगबग सुरू असून शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, येथील शेतकरी भीमराव नारायण पाटील यांच्या शेतालगत असलेल्या विद्युत रोहित्राची (डीपी) प्रचंड दुरावस्था झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून या “डीपी’लगत . या रोहित्राला संरक्षणासाठी लोखंडी पेटी किंवा फेन्सिंगची कोणतीही व्यवस्था नाही. खरीप हंगामामुळे सध्या शेतात ट्रॅक्टर, मजूर आणि शेतकऱ्यांची मोठी…

Read More

मोझरी, कौंडण्यपूर, वलगाव विकास आराखड्यांना 72 कोटी मंजूर:आमदार राजेश वानखडे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाचा निर्णय

तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी, कौंडण्यपूर आणि वलगाव येथील विकास आराखड्यांतील रखडलेल्या कामांना आता गती मिळणार आहे. राज्य शासनाने या तिन्ही विकास आराखड्यांसाठी एकूण ७२ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. आमदार राजेश वानखडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. मोझरी, वलगाव आणि कौंडण्यपूर येथील विकास आराखड्यांमध्ये हस्तांतरणाअभावी निर्माण झालेली अनागोंदी आणि इमारतींची दुरवस्था…

Read More

अमरावती रुग्णालयात अग्निशमन दलाचे प्रात्यक्षिक:कर्मचाऱ्यांना आग विझवण्याचे प्रशिक्षण, सुरक्षिततेबाबत जनजागृती

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) डॉक्टर्स व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांसाठी अग्निशमन दलातर्फे ‘फायर डेमो’ आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्यावतीने आयोजित या विशेष प्रात्यक्षिकात कर्मचाऱ्यांना आग प्रतिबंधक उपाययोजना आणि सुरक्षिततेबाबत माहिती देण्यात आली. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या आवाहनानुसार, मुख्य अग्निशमन अधिकारी दिनेश हंबर्डे आणि अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला….

Read More

अमरावतीचा पार्थ साबूचे सीए इंटरमीडिएट परीक्षेत यश:देशात मिळवला 37 वा क्रमांक, 'कॉस्टिंग'मध्ये 100 पैकी 100 गुण

अमरावती येथील विद्यार्थी पार्थ रोशन साबू याने नुकत्याच जाहीर झालेल्या सीए इंटरमीडिएट परीक्षेच्या निकालात यश मिळवले आहे. त्याने अखिल भारतीय स्तरावर ३७ वे स्थान पटकावले आहे. या कामगिरीमुळे तो अमरावती जिल्ह्यातून पहिला आला आहे. पार्थ साबूने या परीक्षेत ‘कॉस्टिंग’ या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून विशेष कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला सुवर्णपदक…

Read More

वरूडमध्ये आणीबाणीच्या आठवणींना उजाळा:भाजपच्या वतीने विशेष स्मरण कार्यक्रम; डॉ. उपेंद्र कोठीकर उपस्थित

वरूड येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त विशेष स्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. उपेंद्र कोठीकर यांनी २५ जून १९७५ हा भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातील ‘काळा दिवस’ असल्याचे म्हटले. सत्तेसाठी जनतेच्या स्वातंत्र्यावर गदा आणलेला तो भीषण काळ देश कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण…

Read More

शाहू महाराजांचे विचार अंगिकारावे:लोककलावंत प्रमोद पोकळे यांचे आवाहन, नवपिढीला प्रेरणा घेण्याचे आवाहन

लोककलावंत प्रमोद पोकळे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी नवपिढीला त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा आदर्श अंगिकारण्याचे आवाहन केले आहे. धर्म, संस्कृती, राष्ट्रहित आणि सामाजिक एकतेसाठी लोककल्याणकारी योजना राबवून आपले जीवन रयतेसाठी समर्पित करणारे द्रष्टे समाजसुधारक आणि आरक्षणाचे प्रणेते म्हणून शाहू महाराज ओळखले जातात. कलावंत व साहित्यिक आधार संघ, अमरावती यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना…

Read More

अमरावतीतील शाळा 30 जूनपासून सुरू:सीईओ गांधींच्या महत्त्वाच्या सूचना; गुणवत्ता, स्वच्छता आणि विद्यार्थी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश

अमरावती जिल्ह्यातील शाळा मंगळवार, ३० जूनपासून सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी शिक्षण विभागाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. शाळांमध्ये गुणवत्ता, स्वच्छता आणि विद्यार्थी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. विदर्भातील तापमानवाढीमुळे अमरावती जिल्ह्यातील शाळा उशिरा सुरू होत आहेत. या तयारीचा आढावा घेण्यासाठी सीईओ गांधी यांनी शिक्षण…

Read More