Headlines

लाचखोर अधिकाऱ्याचे सीलबंद घर फोडले:नातेवाईकांसह दोघांना रंगेहात अटक, एसीबीच्या कारवाईनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

जळगावातील गणेश कॉलनी परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सील केलेल्या घरात घुसखोरी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, अकोला येथील लाचलुचपत प्रकरणात अडकलेले सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या या सीलबंद घरात शिडीच्या साहाय्याने प्रवेश करणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले आहे. लाचखोर अधिकाऱ्याच्या सीलबंद घरातून संशयास्पद आवाज येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी…

Read More

टीईटी पेपरफुटी: अमरावतीत युवक काँग्रेसने शिक्षणमंत्र्यांचे पुतळे जाळले:नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी

अमरावतीमध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता (महा-टीईटी) परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने आंदोलन केले. रविवारी सकाळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश गुहे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन काळे आणि एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष स्वराज पोटे यांनी केले. भिवंडी येथून पेपरफुटीची प्राथमिक माहिती समोर…

Read More

तुझ्यावरील गद्दारीचा शिक्का कसा पुसणार?:हा वाघचा कातडं पांघरलेला लांडगा निघाला, उद्धव ठाकरेंचा निंबाळकरांवर हल्लाबोल

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून शिवसेनेत दुसरे सर्वात मोठे बंड पाहायला मिळाले असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे 6 खासदार फोडून त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना देण्यात आलेला हा दुसरा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर आक्रमक झालेल्या उद्धव ठाकरे यांनी थेट या 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरे…

Read More

'रिटर्न गिफ्ट' असावे तर असे!:लग्नात 3500 गावकऱ्यांना दिला अपघाती विमा; PM मोदींकडून पेठकर कुटुंबाचे कौतुक

कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील सिद्धेश्वर पेठकर यांच्या विवाहसोहळ्याची सध्या संपूर्ण देशात चर्चा होत आहे. पेठकर कुटुंबीयांनी लग्नाचे ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून सुमारे साडेतीन हजार गावकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा अपघाती विमा काढून दिला आहे. या अनोख्या आणि समाजोपयोगी उपक्रमाची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून, आजच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून त्यांनी या घटनेची…

Read More

TET पेपरफुटी प्रकरणी तिघांना अटक:6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी, भिवंडी पोलिसांच्या तपासाला वेग; आणखी दोन आरोपी फरार

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला भिवंडी पोलिसांकडून मोठी गती मिळाली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. सखोल तपासासाठी पोलिसांनी दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणामागे एक मोठे आंतरराज्यीय रॅकेट सक्रिय असल्याचा दाट संशय…

Read More

एकत्र विमान प्रवासावरून राजकीय कलगीतुरा:मला पंखच नाहीत, तर छाटणार कोण?, उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर

राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका विमान प्रवासातील भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी आज मिश्किल पण ठाम प्रत्युत्तर दिले आहे. “मला पंखच नाहीत, तर छाटणार कोण?” अशा शब्दांत फडणवीसांनी या वादावर भाष्य केले आहे. परभणी येथील सभेत…

Read More

विश्वास नांगरे पाटील आज नागपूर पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार:व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय वाद, समर्थकांकडून केंद्राचा निर्णय शेअर

विश्वास नांगरे पाटील आज नागपूरचे नवे पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. मात्र, पदभार स्वीकारण्यापूर्वीच एका कथित व्हायरल व्हिडिओमुळे ते राजकीय वादात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर केंद्र सरकारचा एक जुना निर्णय व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. नांगरे पाटील यांच्या एका कथित व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या व्हिडिओमध्ये ते…

Read More

रेवतीच्या लग्नात जल्लोष होता, पण तुमच्या नसण्याने जान मिसिंग होती:अजित पवारांच्या निधनाला 5 महिने पूर्ण, रोहित पवारांची भावूक पोस्ट

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताला आज पाच महिने पूर्ण झाले आहेत. २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या या अपघाताने संपूर्ण राज्याला आणि देशाला हादरवून सोडले होते. या घटनेला पाच महिने लोटल्याच्या निमित्ताने, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली…

Read More

गोंदिया जिल्ह्यात गणनेत 32 सारस पक्ष्यांची नोंद:मध्य प्रदेश सीमेवर आढळले 50 सारस पक्षी

गोंदिया जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या वार्षिक सारस पक्षी गणनेत 32 सारस पक्ष्यांची नोंद झाली आहे. वनविभाग, गोंदिया आणि ‘सेवा’ संस्थेने स्थानिक नागरिकांच्या सहभागातून ही गणना यशस्वीरित्या पूर्ण केली. विदर्भाचे वैभव मानल्या जाणाऱ्या या देखण्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ही गणना महत्त्वाची मानली जाते. 20 जून 2026 रोजी गोंदिया जिल्ह्यातील 53 प्रमुख सारस पक्षी अधिवास क्षेत्रांमध्ये पहाटे 4:45 ते…

Read More

बीएलओच्या संपर्कासाठी हिंगोली उपविभागात कम्युनिकेशन प्लॅन:एका क्लिकवर होणार संपर्क; एसडीएम समाधान घुटुकडे यांचा पुढाकार

हिंगोली उपविभागामध्ये निवडणूक विभागाच्या आदेशानुसार मतदार विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत युद्ध पातळीवर काम सुरू झाले असून बीएलओच्या संपर्कासाठी उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या पुढाकारातून क्विक कम्युनिकेशन प्लॅन तयार करण्यात आला आहे. यामध्ये सर्व बीएलओची यादी तयार करण्यात आली असून त्यांचे संपर्क क्रमांक नमूद करण्यात आले आहे. या क्रमांकावर क्लिक केल्यानंतर लगेचच त्यांच्याशी संपर्क होणार आहे. या…

Read More