पावसाचा अंदाज पाहूनच पेरणीचा निर्णय घ्या:बियाणे-खतांचा पुरेसा साठा उपलब्ध, काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई – दत्तात्रय भरणे
राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असला तरी काही ठिकाणी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक पावसाची परिस्थिती आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. तसेच राज्यात बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी…
