मोर्शीत मोकाट जनावरांमुळे अपघातात वाढ:रस्त्यांवरील कळपांमुळे नागरिक त्रस्त, नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
मोर्शी शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. काही वर्षांपूर्वी येथे मोठा अपघातही घडला होता. नगरपालिका प्रशासनाकडून मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सातत्याने राबवली जात नाही. त्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात मोकाट जनावरांचा त्रास अधिक वाढला…
