राज्य शासनाचे प्रतिष्ठेचे चित्रपट पुरस्कार जाहीर:पं. हृदयनाथ मंगेशकर, सलीम खान यांना जीवनगौरव; राणी मुखर्जी, प्रसाद ओक यांचाही सन्मान
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांची यंदाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिग्गज कलाकारांचा यंदा या पुरस्कारांद्वारे गौरव करण्यात येणार असून, ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज पटकथालेखक सलीम खान यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे….
