Cash At Home: सर्वसामान्यांनी त्यांच्या घरात १०० आणि २०० रुपयांच्या नोटा जमा करण्यास सुरुवात केली आहे. आरबीआयच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. एकीकडे ऑनलाईन पेमेंट्सचं प्रमाण वाढत असताना दुसऱ्या बाजूला लोकांनी घरात नोटा जमा करण्यास सुरुवात केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: देशात ऑनलाईन पेमेंट आणि यूपीआयच्या वापरात विक्रमी वाढ होत असताना रोख रकमेचं महत्त्व पूर्णपणे संपलेलं नाही. लोक आपल्या घरात १०० आणि २०० च्या नोटा आधीपक्षा जास्त प्रमाणात ठेवत असल्याची माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या तपशीलातून ही माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे लोकांच्या सवयीत झालेला बदल कोणत्याही सरकारी घोषणा किंवा नोटांच्या बदलांमुळे झालेला नाही. लोकांची बदलती मानसिकता यातून स्पष्ट दिसत आहे. गरज भासल्यास लहानसहान कामांसाठी, दैनंदिन व्यवहारांसाठी १०० आणि २०० च्या नोटा अधिक सोयीस्कर असल्याचं लोकांना वाटू लागलं आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मध्य पूर्वेतीत तणाव आणि जगभरात निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरता यामुळे लोक आधीपेक्षा जास्त सतर्क झाले आहेत. याच अस्थिरतेमुळे अनेक कुटुंब सावधगिरीचा उपाय म्हणून आपल्याकडे रोख रक्कम बाळगणं जास्त श्रेयस्कर समजतात. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास, डिजिटल सेवा विस्कळीत झाल्यास, बँकिंग सुविधांमध्ये अडचणी आल्यास घरात रोकड असावी, अडचणीच्या परिस्थितीत रोख रक्कम कामी येईल, असा विचार करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे कमी मूल्यांच्या नोटांची मागणी हळूहळू वाढत आहे. US China Currency War: डॉलरच्या साम्राज्याला चीन सुरूंग लावणार, भारताचा शेजारी अमेरिकेच्या मुळावर वार करणार? बीजिंगच्या खेळीने जागतिक समीकरणं बदलणार महामारीनंतर लोकांचा विचार बदलला करोना महामारीच्या दरम्यान लोकांनी आपत्कालीन स्थितीचा सामना केला. त्यावेळी गरजेच्या सेवाही ठप्प झाल्या होत्या. त्यातून अनेक कुटुंबांनी धडा घेतला आहे. घरात मर्यादित प्रमाणात रोकड ठेवणं गरजेचं असल्याचा धडा करोनानं माणसांना दिला. लोकांचा बँकिंग किंवा डिजिटल प्रणालीवरील विश्वास पूर्णपणे उडाला असल्याचा याचा अर्थ होत नाही. आजही बहुतांश लोक ऑनलाईन व्यवहार करतात. पण त्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी म्हणून स्वत:कडे काही प्रमाणात रोकड ठेवू लागले आहेत. आता हळूहळू याचं रुपांतर सवयीत झालं आहे. पगारातून TDS कापला पण भरला नाही, आयकर विभागाने दिली 3.36 लाखांची नोटीस; मुंबईतील IT प्रोफेशनलसोबत काय घडलं? १०० आणि २०० रुपयांच्या नोटांची उपलब्धता कायम आहे. त्यात कोणतीही कमतरता निर्माण झालेली नाही. बँकिंग व्यवस्था आणि रोकड पुरवठा आधीप्रमाणेच सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या गरजेइतक्या नोटा उपलब्ध आहेत. त्यामुळे कमी मूल्यांच्या नोटांच्या वाढत्या मागणीकडे एखादं संकट मानता येत नाही. याकडे केवळ लोकांची सावधगिरी आणि आर्थिक तयारीच्या मानसिकतेच्या दृष्टीनं पाहता येईल. गरजेच्या केवळ रोख रक्कम कामी येईल, हाच विचार करुन मोजका पैसा घरात ठेवला जात आहे. मोठ्या प्रमाणात रोकड जमा करुन ठेवण्याकडे लोकांचा कल नाही.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा