Headlines

Buldhana missing girl Shivani Kalmikar alive police releases brother father mystery of woman death Crime News; बाप-भावाला तुरुंगात टाकलं, पण शिवानी जिवंत निघाली, आता ‘तिची’ ओळख पटवण्यासाठी पोलिसांची आयडिया, नवं पत्रक जारी


Buldhana Missing Girl : ​जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात धड आणि मुंडके कापून हत्या केलेल्या तरुणीचा दफनविधी पोलिसांनी केला होता.

Buldhana Shivani Kalmikar Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : मृत तरुणीची ओळख अद्याप पटली नाही. आता ती बॉडी आढळलेल्या तरुणीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी लोकांची मदत घेण्याचे ठरविले असून, त्यासाठी पत्रक जारी केले आहे. मृत तरुणीबद्दल माहिती देणाऱ्यास ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्याचे पोलिस प्रशासनाने जाहीर केले आहे.

पुरलेलं शव बाहेर काढण्याची वेळ

जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात धड आणि मुंडके कापून हत्या केलेल्या तरुणीचा पोलिसांनी दफनविधी केला होता. आता पोलिसांवर पुन्हा नव्याने तपास करण्यासाठी पुरलेलं शव बाहेर काढण्याची वेळ आली. बॉडी बाहेर काढल्यानंतर न्यायवैद्यक पथकाने तपासणी केल्याचे समजते. या प्रकरणात विशेष पोलिस महानिरीक्षक महेश पाटील यांनी जातीने लक्ष घातले असून बुधवारी ते तीन ते चार तास जळगाव जामोद पोलिस ठाण्यात होते.

तरुणीच्या शवाची ओळख पटविणे आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक महेश पाटील यांनी तपास यंत्रणेला मार्गदर्शन केल्याची माहिती आहे. पाटील हे घटनास्थळी गेले होते. तेथे बारकाईने त्यांनी निरीक्षक केल्याचे सूत्रांकडून समजते. पोलिसांचा चुकीच्या दिशेने भरकटलेला तपास आणि निरपराध लोकांना हत्येमध्ये गोवण्याचा झालेला प्रयत्न यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाले आहे.

हत्येचं गूढ

मध्य प्रदेशातील खडकी येथील शिवानी कलमेकर हिचे ते शव होते आणि वडील-भावानेच तिची हत्या केली, या निष्कर्षावर पोहोचून पोलिसांनी हत्येचा उलगडा केल्याचा दावा केला होता. स्थानिक गुन्हे शाखा आणि जळगाव जामोद पोलिस मोकळे झाले होते. परंतु शिवानी जिवंत पोलिसांसमोर उभी ठाकल्याने या हत्येमागील गूढ वाढले. हत्याकांडाला वेगळीच कलाटणी मिळाली आणि पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले.

पोलिस महानिरीक्षकांच्या भेटी दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक श्रेणीक लोढा, उपविभागीय पोलिस अधिकारी तथा तपास अधिकारी संतोष खाडे, तहसीलदार पवन पाटील, मलकापूर उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद महाजन, वाशीम स्थानिक गुन्हे शाखा पथक, विशेष शोध मोहीम पथक हजर होते.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा