Viral Riddle: समोर सिंह, मागे लांडगा आणि खाली शिकारी मासे…अशा वेळी मुलगा स्वतःचा जीव कसा वाचवेल? हे कोडं सोडवा आणि तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा.

मुलगा आपला जीव कसा वाचवेल?
हे कोडं सोडवण्यासाठी तुम्हाला चौकटीबाहेर जाऊन विचार करावा लागेल. कारण या कोड्यामध्ये कुठलंही गणिती सूत्र नाही किंवा कुठलीही आकडेमोड करायची नाही. तुम्हाला फक्त तुमच्या तल्लख मेंदूचा वापर करावा लागेल. चला तर मग, या कोड्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया.
0
0
0
0
0
बराच वेळ विचार करूनही जर तुम्ही वैतागला असाल, तर खाली दिलेलं चित्र पाहा. त्यामध्ये कदाचित तुम्हाला या कोड्याचं उत्तर सापडेल.
हे येईल उत्तर
अशा प्रकारच्या कोड्यांमध्ये एकच उत्तर ठामपणे देता येत नाही. पण साधारणपणे या कोड्याची दोन-तीन उत्तरं देता येऊ शकतात.
१ – सिंह आणि लांडगा या दोघांना एकमेकांशी भिडू द्या आणि त्या संधीचा फायदा घेत पळून जा.
२ – पूल जोरजोरात हलवा. त्यामुळे प्राण्यांचं संतुलन बिघडेल आणि ते खाली शिकारी मासे असलेल्या नदीत पडतील. त्यामुळे मुलाला पळून जाण्याची संधी मिळेल.
३ – जागेवरच शांतपणे उभं राहा. कारण सिंह मुलाची शिकार करण्यापूर्वी आधी लांडग्याला पळवून लावण्याचा प्रयत्न करेल. कारण तसं केलं नाही, तर सिंहाला मुलाची शिकार करता येणार नाही. अशा परिस्थितीत मुलाला पळून जाण्याची संधी मिळू शकते.
असो, पण या कोड्याचं तुम्हाला वेगळं उत्तर सुचलं असेल, तर ते कमेंट सेक्शनमध्ये आमच्यासोबत नक्की शेअर करा. आणि हो, हे कोडं तुमच्या मित्र-मंडळींनाही पाठवा आणि पाहा, ते काय उत्तर शोधून काढतात!
(ai image generator)

