BJP Lady Candidate Husband detained by Bhandara Police after Vulgar Social Media Post goes viral; सोशल मीडियावर अश्लील पोस्ट चर्चेत, भाजप उमेदवाराच्या पतीला उचलून नेले!
BJP Lady Candidate Husband detained by Bhandara Police after Vulgar Social Media Post goes viral; सोशल मीडियावर अश्लील पोस्ट चर्चेत, भाजप उमेदवाराच्या पतीला उचलून नेले!
Bhandara News : ही कारवाई एफआयआर दाखल न करताना राजकीय दबावाखाली करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, भंडारा : नगर परिषदेची निवडणूक तापू लागली असताना भंडाऱ्यात रविवारी सोशल मीडियावरील एक पोस्ट चर्चेत आली. या पोस्टवरून भंडाऱ्यातील भाजपच्या एका महिला उमेदवाराच्या पतीला पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी राजकीय दबावाखाली येऊन जाणीवपूर्वक ही कारवाई केल्याचा आरोप करीत भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन भंडाऱ्याचे ठाणेदार आणि दोषी पोलिसांवर निलंबनाची मागणी केली.
अश्लील पोस्ट चर्चेत
सोशल मीडियावर शनिवारी एक अश्लील पोस्ट चर्चेत आली. या पोस्टवरून मध्यरात्री दीड वाजता भंडारा येथील प्रभाग क्रमांक सातच्या महिला उमेदवारांचे पती विनोद भुरे यांच्या घरी सहाय्यक पोलिस निरीक्षक खांदाडे आणि काही पोलिस कर्मचारी पोहोचले. संबंधित पोस्ट तुम्ही केल्याचे सांगत त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन जाण्यास निघाले. Maharashtra Politics : मनसे-उद्धवसेनेत वादाची ‘मशाल’ पेटली, राज ठाकरेंच्या ‘त्या’ 11 उमेदवारांवरुन धुसफूस, ठाकरे गटाकडून नाराजी मान्य कारवाईदरम्यान, पोलिसांनी भुरे यांना घरातून बाहेर काढले आणि त्यांचा मोबाइल फोन जप्त केला. ही कारवाई एफआयआर दाखल न करताना राजकीय दबावाखाली करण्यात आल्याचा आरोप भुरे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे, भाजप नेते जॅकी रावलानी यांनी पत्रकार परिषदेत केला.
पोलिस अधीक्षकांकडे तक्रार
निवडणूक काळात राजकीय पुढाऱ्यांच्या दबावात येऊन कारवाई करणारे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, यासाठी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली. तक्रारीवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस अधीक्षकांनी दिल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सोबतच या प्रकरणाची तक्रार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. Mumbai Crime : बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकाला मुंबईत भरदिवसा संपवलं, शिवजयंती गाजवणारे ‘महाराज’ काळाच्या पडद्याआड, आरोपी फक्त…
शिल्पाराणी वाडकर भाजपमध्ये
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेनेच्या माजी नगरसेवक शिल्पाराणी वाडकर यांनी रविवारी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. या वेळी शहराध्यक्ष किशोर शितोळे, समीर राजूरकर, संजय जोशी, ताराचंद गायकवाड, छाया खाजेकर, उज्ज्वला दहिफळे, हर्षवर्धन कराड, सचिन मिसाळ, हाफिज शेख, वंदना शाह आदींची उपस्थिती होती.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा