BJP distressed modi and shah will have to sit on the opposition benches says sanjay raut; भाजप अस्वस्थ, मोदी-शाह यांना विरोधी बाकांवर बसावं लागेल; राहुल गांधींच्या एण्ट्रीआधी पुण्यातून संजय राऊतांचा हल्लाबोल
BJP distressed modi and shah will have to sit on the opposition benches says sanjay raut; भाजप अस्वस्थ, मोदी-शाह यांना विरोधी बाकांवर बसावं लागेल; राहुल गांधींच्या एण्ट्रीआधी पुण्यातून संजय राऊतांचा हल्लाबोल
पुणे : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. पुण्यात आयोजित ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी संवाद मेळाव्यासाठी राहुल गांधी उपस्थित राहत असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपच्या धोरणांवर कडाडून टीका केली आहे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असून लवकरच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये विरोधकांच्या बाकांवर बसावे लागेल, अशी टीका राऊतांनी केली आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपला राजकीय समीकरणांची आठवण करून दिली. राहुल गांधी जेव्हा राजकारणात आले, तेव्हापासून त्यांच्या क्षमतेवर आपला ठाम विश्वास होता. सुरुवातीला जेव्हा अनेकांनी राहुल गांधींची खिल्ली उडवत त्यांना ‘पप्पू’ म्हणून हिणवले, तेव्हा हाच नेता भविष्यात देशाचे नेतृत्व करेल, अशी भूमिका मांडणारा मी पहिला व्यक्ती होतो, असे राऊत यांनी नमूद केले.
केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधताना संजय राऊत म्हणाले की, सत्ता गमावण्याच्या भीतीने भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. सप्टेंबर महिन्यानंतर या सरकारच्या पडझडीची प्रक्रिया सुरू होईल. राहुल गांधी यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि जनसमर्थनामुळे सत्ताधाऱ्यांचे चेहरे भयभीत झाले आहेत. संसदेबाहेरील आंदोलनात संसद मार्ग पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन पॅलेट गन प्रकरणात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंदवायला लावून राहुल गांधींनी सरकारला माघार घेण्यास भाग पाडल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
राहुल गांधी यांच्या विद्यार्थी संवाद कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांनी तब्बल ३० अटी लादल्याच्या मुद्द्यावर राऊतांनी तीव्र आक्षेप घेतला. राहुल गांधी हे देशाच्या संसदेतील अधिकृत विरोधी पक्षनेते आणि या देशाचे जबाबदार नागरिक आहेत, ते काही परदेशातून आलेले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. पुण्यात जेव्हा अमित शाह किंवा भाजपचे अन्य ज्येष्ठ नेते येतात, तेव्हा प्रशासनाकडून अशा प्रकारच्या जाचक अटी लादल्या जातात का, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा