Bhuvneshwar Kumar opens up on Team India comeback and transition phase virat kohli ravi shastri ; माझी निवड का होत नाही, मी कुठे चुकलो? विचारच सोडला! भुवीचं टीम इंडियातील कमबॅकवर पहिल्यांदाच थेट भाष्य
Bhuvneshwar Kumar opens up on Team India comeback and transition phase virat kohli ravi shastri ; माझी निवड का होत नाही, मी कुठे चुकलो? विचारच सोडला! भुवीचं टीम इंडियातील कमबॅकवर पहिल्यांदाच थेट भाष्य
Bhuvneshwar Kumar On Team India Comeback : आयपीएल २०२६ मधील धमाकेदार कामगिरीनंतर भुवनेश्वर कुमारने टीम इंडियातील पुनरागमनावर मौन सोडले आहे. त्याने आरसीबी पॉडकास्टमध्ये या सगळ्यावर भाष्य केले आहे. भुवी नेमकं काय म्हणाला?
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय संघात सध्या बदलाचा काळ सुरू आहे. तरुण खेळाडूंना संधी दिली जात असली तरी चाहत्यांना मात्र जुन्या खेळाडूंची आठवण येत आहे. त्यातच मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार या दोन स्टार गोलंदाजांची नावे सातत्याने चर्चेत आहेत. आयपीएल २०२६ मध्ये १६ सामन्यांत २८ विकेट्स घेऊन दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी गोलंदाज ठरलेल्या भुवनेश्वर कुमारने आता भारतीय संघात पुनरागमन करण्यावर एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे.
संघात पुनरागमनाबद्दल काय म्हणाला भुवी?
आरसीबी पॉडकास्टमध्ये बोलताना भुवनेश्वर कुमारने सांगितले की, आता भारतीय संघात पुनरागमन करण्याबाबत त्याच्या मनात कोणताही विचार चालत नाही. भुवी म्हणाला, “मी पूर्णपणे शांत आहे. याचे श्रेय मी माझ्या कुटुंबाला देईन. माझ्या घरी क्रिकेटवर अजिबात चर्चा होत नाही. माझी संघात निवड का झाली नाही किंवा माझी कुठे चूक झाली, असा विचार मी करत नाही. म्हणूनच आज माझ्या मनात कोणताही पश्चात्ताप नाही.”
“खेळाडूंचा एक काळ असतो”
संघातील बदलांवर बोलताना भुवीने स्पष्ट केले की, “खेळाडूंचा एक काळ असतो. जुन्या खेळाडूंची जागा तरुण खेळाडू घेतात आणि हा खेळाचाच एक भाग आहे. माझ्याआधीही अनेकांसोबत हे घडले आहे आणि माझ्या नंतरही घडेल. हीच खेळाची खरी सत्यता आहे. मी जिथे आहे तिथे खूप आनंदी आहे.”
भुवीने पुढे सांगितले की, “मी भारतासाठी खेळलो आहे. पुन्हा संधी मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे, पण आता मी फक्त क्रिकेटवर प्रेम आहे म्हणून खेळत आहे. मी डोमेस्टिक क्रिकेट, यूपी टी२० लीग आणि आयपीएल खेळत राहतो, जेणेकरून मी मॅचसाठी तयार राहीन. आधी माझे ध्येय टीम इंडियासाठी खेळणे हे होते, पण आता मला क्रिकेटचा खरा अर्थ समजला आहे, ‘कंट्रोल द कंट्रोलेबल्स’ आणि खेळाचा आनंद घ्या.”
भारतात तयार झालेल्या ‘पेस बॉलिंग रेव्होल्यूशन’चे श्रेय भुवीने विराट कोहली आणि रवी शास्त्री यांना दिले आहे. तो म्हणाला की, “विदेशी भूमीवर जाऊन जिंकणे आणि एक मजबूत फास्ट बॉलिंग अटॅक तयार करणे, हा विराट आणि रवी शास्त्रींचा स्पष्ट दृष्टिकोन होता. त्या काळात भारतातही वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्ट्या तयार केल्या गेल्या, ज्यामुळे परदेशात खेळण्याची चांगली तयारी झाली.” याशिवाय माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमारनेही कारकिर्दीत खूप मदत केल्याचे भुवीने नमूद केले.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा