Bhandara Crime News: भंडारा येथे जुन्या वैमनस्यातून दोघांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

या घटनेतील मृतांची ओळख पटली असून यामध्ये ती टिंकू (वसीम) खान (वय 42) आणि शशांक गजभिये अशी आहे. ते भंडारा येथील मुस्लिम ग्रंथालय संकुलातील रहिवासी आहेत. शहरातील मुस्लिम ग्रंथालय चौकात दिवसा आणि रात्री गर्दी असते. मुस्लिम लायब्ररी चौक हे शहराचे मुख्य निवासी संकुल आहे. मोठ्या बाजारपेठेला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. मुस्लिम लायब्ररी-मिस्किन गार्डन रस्त्यावर टिंकू वसीम खान आणि त्याचा मित्र शशांक हा रात्री 10 च्या सुमारास पोहोचले.
UP News: घरात अस्ताव्यस्त सामान, तृतीयपंथी महिला आणि भावाची हत्या, बेडमध्ये बॉडी अन्… भयंकर घटना
गाडीवरुन खाली उतरताच हल्लेखोरांकडून हल्ला
बहुतेक हल्लेखोरांची नजर त्यांच्यावर पूर्वी पासूनच असावी. टिंकू खान हा गाडी खाली उतरताच पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. या दरम्यान आपल्या मित्रावर हल्ला होत असल्याचं पाहून शशांक याने हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, हल्लेखोरांनी शशांक याच्यावरही चाकूने सपासप वार केले आणि तेथून पसार झाले.
बघ्यांची प्रचंड गर्दी, पण कोणीही त्यांना रोखू शकलं नाही
घटना घडतेवेळी त्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी होते, परंतु त्यांना रोखण्याची हिंमत कुणाचीच झाली नाही. हल्लेखोर पसार झाल्यावर रक्तांनी माखलेल्या टिंकू आणि शशांक याला लोकांनी जिल्हा रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

