Girl attends HSC Exam after Father Death : दु:खावर मात करत मनात वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जान्हवीने वडिलांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि ती परीक्षेला निघाली
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, भंडारा : मागील काही दिवसांपासून मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या वडिलांचा सोमवारी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी मुलीचा बारावीचा पहिला पेपर होता. वडिलांना अखेरचा निरोप देत मुलीने परीक्षा दिली. या हृदयद्रावक घटनेने आंबागड गावात शोककळा पसरली आहे.
भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील आंबागड येथील रहिवासी हौशीलाल रहांगडाले (वय ४८) हे मागील काही दिवसांपासून मानसिक आजाराने त्रस्त होते. त्यांचा ९ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता दरम्यान मृत्यू झाला.
मुलगी जान्हवी ही बारावीत असून तिची मंगळवारी बोर्डाची परीक्षा सुरू होणार होती. गावकऱ्यांनी मंगळवारी सकाळी ९ वाजता हौशीलाल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. दु:खावर मात करत मनामध्ये वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता जान्हवीने वडिलांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाली. तर जान्हवी ही तुमसर येथील जनता शाळेतील परीक्षा केंद्रावर पेपर द्यायला निघाली. या दोन घटनांमुळे गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. Soham Katre : डोंबिवलीच्या सोहमचा लोकलमधून पडून बळी, वडील ZP मतदानासाठी गावी, आई-भावापासून संध्याकाळपर्यंत लपवलेलं; आता दादाची हात जोडून मागणी
पुण्यात सीआरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू
दुसरीकडे, देशसेवेसाठी कर्तव्य बजावून आपल्या कामासाठी गावी आलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) जवानाचा अपघाती मृत्यू झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी-देवकर येथील तोंडेवस्तीजवळ रस्ता ओलांडताना भरघाव वाहनाच्या धडकेत मराडेवाडीचे (ता. इंदापूर) सुपुत्र आणि सीआरपीएफ जवान महादेव दादा नाझीरकर (वय ३४) यांचा मृत्यू झाला.
Mumbai News | CSMT – Goregaon local train ३ महिने बंद राहणार, लाखो प्रवासी चिंतेत
महादेव नाझीरकर हे सीआरपीएफमध्ये कार्यरत असल्याने ते मुंबईत वास्तव्यास होते. रविवारी रात्री ते सुट्टीवर आपल्या गावी मराडेवाडी येथे आले होते. त्यांचे वडील त्यांना घेण्यासाठी आलेले असता, रस्ता ओलांडून जात असताना भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि मुले असा परिवार आहे. Satara Crime : मैत्रिणीशी अनैतिक संबंधाचा संशय, व्हिडिओ पाहून पित्त खवळलं, नवी मुंबईतील हवालदाराने साताऱ्यात तरुणाला संपवलं मुलगा सुट्टीवर आल्याने वडील दादा लक्ष्मण नाझिरकर रात्री त्यांना घेण्यासाठी आले होते. मात्र, वडिलांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या काळजाचा तुकडा काळाच्या पडद्याआड गेला. अपघात झाला तेव्हा महादेवचे वडील रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभे होते. आपल्या लेकाचे घरी येणे ते डोळे भरून पाहत होते; पण पुढच्याच क्षणी अज्ञात वाहनाने महादेवला चिरडले. या धक्कादायक प्रसंगामुळे पित्याला मोठा मानसिक धक्का बसला.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा