Headlines

Bhandara Ashish Tikaram Samaritan this Young Boy Died After Falling from the Harihar fort in Nashik; गडावर फिरायला गेला, पाय घसरुन दरीत कोसळला; भंडाऱ्यातील तरुणाचा नाशकात हृदयद्रावक अंत


Nashik Harihar Fort Youth Dies : नाशिक जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील तरुण नाशिकमध्ये फिरायला आले होते. यावेळी तो हरिहर गडावर गेला असता त्याचा पाय घसरला आणि तो खोल दरीत जाऊन कोसळला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

Nashik Harihar Fort Youth Dies
नाशिक हरिहर किल्ल्यातील युवकाचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रतीक तांबोळी, भंडारा : नाशिक जिल्ह्यात पर्यटनादरम्यान झालेल्या अपघातात शहराजवळील खमारी बुटी गावातील एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. मृताचं नाव आशिष टिकाराम समारीत (वय 25) असं आहे. तो त्याच्या मित्रांसोबत पावसाळी पर्यटनासाठी गेला होता. या पर्यटनादरम्यान तो नाशिक जिल्ह्यातील हरिहर किल्ल्यावर पोहोचला, त्यावेळी तो डोंगराच्या घाटावरून घसरून दरीत पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

आशिष आणि त्याचे सुमारे २० साथीदार एका मिनी ट्रॅव्हल्सने महाराष्ट्र दर्शनासाठी निघाले होते. काल शनिवारी ते नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तहसीलमधील हरिहर किल्ल्यावर पोहोचले. किल्ला फिरून झाल्यावर ते दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सर्व साथीदार डोंगरावरून खाली उतरत होते. यादरम्यान पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता. ज्यामुळे आशिषचा तोल गेला आणि तो थेट खोल दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू झालं, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि खूप प्रयत्नानंतर मृतदेह दरीतून बाहेर काढला. अपघाताची बातमी गावात पोहोचताच शोककळा पसरली.

Maharashtra Timesमराठा आरक्षणाच्या आंदोलनात मोठा ट्विस्ट, सरसकट नका करु, मनोज जरांगे यांनी सरकारला नवा पर्याय सुचवला

खमारी बुटी गावात शोकाचे सावट

गावातील सुमारे २० तरुणांनी महाराष्ट्र दर्शनाचं नियोजन केलं होतं. परंतु या प्रवासादरम्यान आशिषच्या निधनामुळे आनंदाच्या वातावरणाचं शोकात रूपांतर झालं. आशिष अविवाहित होता. त्याच्या पश्चात वडील टिकाराम समारीत, आई, तीन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे. अचानक झालेल्या अपघातानं संपूर्ण कुटुंबाला खूप धक्का बसला आहे. संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. अपघातानंतर नाशिकमध्ये मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर मृतदेह गावी पाठवण्यात आला.

Maharashtra TimesCrime News : ‘तुम्ही ड्रेनेज दुरुस्त करुन द्या’; दुरुस्तीला आले अन् धक्कादायक चित्र समोर, छत्रपती संभाजीनगर हादरलं

आज रविवारी सकाळी आशिषचा मृतदेह खमारी येथे पोहोचला. जेथे गावकऱ्यांच्या उपस्थितीत आशिषचे अंतिमसंस्कार करण्यात आले. आशिष हा त्याच्या मित्रांमध्ये एक मेहनती, शांत आणि लोकप्रिय तरुण होता. शेतकरी कुटुंबात वाढलेला आशिष आपल्या कष्टाने आयुष्यात पुढे जाण्याचं स्वप्न पाहत होता. पण नियतीने अल्पावधीतच त्याचं आयुष्य हिरावून घेतलं. त्याच्या मृत्यूबद्दल लोकांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. आशिषच्या तरुण वयात झालेल्या निधनानं त्याचे मित्रही हैराण झाले आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा