BEST ordered to pay Mahim Hemant Joshi family Rs 5 crore for 2018 Mulund Bus Accident Crime News; मुलुंड बेस्ट बस अपघात हेमंत जोशी मृत्यू, कुटुंबाला आठ वर्षांनी न्याय, 5.25 कोटींची रक्कम दोन महिन्यात देण्याचे मुंबई महापालिकाला आदेश
BEST ordered to pay Mahim Hemant Joshi family Rs 5 crore for 2018 Mulund Bus Accident Crime News; मुलुंड बेस्ट बस अपघात हेमंत जोशी मृत्यू, कुटुंबाला आठ वर्षांनी न्याय, 5.25 कोटींची रक्कम दोन महिन्यात देण्याचे मुंबई महापालिकाला आदेश
Mulund BEST Bus Accident 2018 : हेमंत जोशी यांचा १५ मे २०१८ रोजी मुलुंडमध्ये अपघाती मृत्यू झाला होता. काळजीपूर्वक कारच्या दिशेने परत येत असताना भरधाव ‘बेस्ट’ बसने दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुलुंड येथे पूर्व द्रुतगती मार्गाजवळच्या सर्व्हिस रोडवर रस्ता ओलांडताना भरधाव बेस्ट बसने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन जीव गमावलेल्या इंटिरिअर डिझायनरच्या कुटुंबाला व्याजासह सुमारे सव्वापाच कोटी रुपयांची भरपाई देण्याचा आदेश मोटार वाहन अपघात दावे न्यायाधिकरणाने (मॅक्ट) मुंबई महापालिकेला नुकताच दिला आहे. यामुळे माहिमचे रहिवासी असलेल्या जोशी कुटुंबाला आठ वर्षांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ही गेल्या काळातील नुकसना भरपाईची सर्वात मोठी रक्कम मानली जात आहे.
आठ वर्षांपूर्वी बेस्टच्या धडकेत मृत्यू
‘हेमंत जोशी ॲण्ड असोसिएट्स’चे मालक असलेले हेमंत जोशी यांचा १५ मे २०१८ रोजी दुपारी अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या आई शकुंतला, पत्नी भाग्यश्री, मुलगा यशोधन व मुलगी ईशा यांनी ‘मॅक्ट’समोर दावा दाखल केला.
दोन महिन्यात रक्कम देण्याचे आदेश
प्रकरण प्रलंबित असताना शकुंतला यांचे निधन झाले. त्यामुळे न्यायाधिकरणाने व्याजासह भरपाईच्या रकमेपैकी ६० टक्के रक्कम भाग्यश्री यांना आणि मुलगा व मुलीला प्रत्येकी २० टक्के रक्कम दोन महिन्यांत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा आदेश महापालिकेला दिला.
‘हेमंत जोशी हे लोअर परळ येथील उर्मी इस्टेटमधील व्हीएफएस ग्लोबल येथे चालक सुभाष गाडेकर व सहायक सचिन चव्हाण यांच्यासोबत गेले होते. काम आटोपल्यानंतर तिघेही जोशी यांच्या कारने ठाण्याच्या दिशेने निघाले. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास कार मुलुंड येथील पूर्व द्रुतगती मार्गाच्या सर्व्हिस रोडवर आली असताना जोशी यांनी लघुशंकेसाठी कार थांबवली. त्यानंतर ते काळजीपूर्वक कारच्या दिशेने परतत असताना भरधाव बसने त्यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. गाडेकर व चव्हाण यांनी त्यांना तातडीने फोर्टिस रुग्णालयात नेले. मात्र, उपचारांदरम्यान दोन दिवसांनी म्हणजेच १७ मे २०१८ रोजी त्यांचा मृत्यू झाला’, असे म्हणणे अर्जदारांतर्फे मांडण्यात आले. त्यांच्या वकिलांनी या म्हणण्याच्या समर्थनार्थ जोशी यांचे सहायक चव्हाण यांच्या साक्षीचा व अन्य पुराव्यांचा आधार घेतला.
जोशी यांच्या निष्काळजीमुळेच त्यांचा अपघात झाल्याचा दावा महापालिकेने केला. ‘ती बस मुलुंड बस आगारातून प्रबोधनकार ठाकरे उद्यानाच्या दिशेने जात होती. बस चालकाने भांडुप पीव्हीएम बस थांब्यावर बस थांबवल्यानंतर पुढे नेली असता, जोशी अचानक बससमोर आले. ते रस्ता ओलांडताना मोबाइलवर बोलत होते. त्यामुळे त्यांचे बसकडे आणि बसचा लकाने वाजवलेल्या हॉर्नकडेही लक्ष गेले नाही. त्यामुळे चालकाची चूक नव्हती’, अशा स्वरूपाचा युक्तिवाद ‘बेस्ट’च्या वतीने महापालिकेने मांडला.
मात्र, ‘पोलिसांनी केलेला तपास, आरोपपत्र, तसेच घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेले चव्हाण यांची साक्ष यावरून चालकाने बेदरकार व निष्काळजीने बस चालवल्याचे सिद्ध होते’, असा निष्कर्ष नोंदवत न्यायाधिकरणाने महापालिकेचा युक्तिवाद फेटाळला.
साकीनाक्यात चिमुकल्यास कारने चिरडले
दुसरीकडे, साकीनाका येथील दोस्ती प्लाझा इमारतीच्या प्रवेशद्वारावर कारने दीड वर्षाच्या मुलास चिरडल्याची घटना घडली. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दीड वर्षाचा मुलगा आपल्या पाच वर्षांच्या भावासोबत खेळत असताना हा अपघात घडला. या प्रकरणी साकीनाका पोलिस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tukaram Mundhe : हे मुंढे कोण आहेत? रिझर्व्हेशन लिस्टमध्ये नाव पाहताच रेस्टॉरंट चालक चपापले, मित्राचा फोन, तुकाराम मुंढेंच्या मुलाचा भन्नाट किस्सादोस्ती प्लाझा इमारतीत अस्लम पटेल हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शनिवारी सायंकाळी त्यांचा पाच वर्षांचा मुलगा अब्दुल हादी आणि दीड वर्षांचा मुलगा अब्दुल समद हे दोघे इमारतीखाली खेळत होते. प्रवेशद्वारावर असताना एक कार अचानक आतमध्ये शिरली. त्यावेळी अब्दुल समद कारखाली चिरडला गेला. अपघात झाल्याचे समजताच कुटुंबीय खाली आले. कार चालकाच्या मदतीने आधी खासगी आणि नंतर सेव्हन हिल्स रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अब्दुल समद याचा मृत्यू झाला. निष्काळजीने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा