Headlines

Belonging- A Journey Of Love,Sonia Gandhi Book: वादाचे नवे पान – sonia gandhi biography book belonging- a journey of love


काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग : ए जर्नी ऑफ लव्ह’ या बहुचर्चित आत्मचरित्राच्या भारतातील नियोजित प्रवासालाच उत्सुकता आणि राजकीय वादाचे पान उलगडले आहे.

पुस्तकातील काही भागावरून लेखक व प्रकाशकांमध्ये झालेले मतभेद, हे त्यामागील कारण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीची सोनिया यांची निरीक्षणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतचे भाष्य आणि भारत-चीन संबंधांच्या हाताळणीबाबतचे उल्लेख यांवरून मतभेद झाल्याचे ‘सूत्रे’ सांगतात. ‘पेंग्विन’च्या कायदा व संपादन विभागाने काही भागांबाबत सुचवलेले बदल करण्यास किंवा वगळण्यास सोनिया यांनी नकार दिल्याने ‘पेंग्विन’ने माघार घेतल्याचे सांगितले जाते. त्यावरून काँग्रेसनेत्यांनी सरकारवर दबावतंत्र-अघोषित सेन्सॉरशिपचाही आरोप केला.

भारतीय राजकारणातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असलेल्या सोनियांच्या जीवनाबाबत एक गूढ वलयदेखील आहे; त्यांनी वैयक्तिक-राजकीय जीवनातील अनेक बाबींवर भाष्य केलेले नाही. आता या पुस्तकातून इटलीतील त्यांचे बालपण, राजीव गांधी यांच्याशी जुळलेले प्रेम, विवाह, गांधी कुटुंबातील प्रवेश, पुढे दीर संजय, सासू इंदिरा गांधी आणि पती राजीव यांचे अकाली मृत्यू येथपासून ते राजकारणातील प्रवेश, यूपीए सरकारची स्थापना आणि पंतप्रधानपदास दिलेला नकार, अशा अनेक घटनांमागील इतिहास उलगडणार आहे. त्यामुळे जिज्ञासू वाचकांच्या त्यावर उड्या पडणार, याचा व्यावसायिक अंदाज आलेले अनेक प्रकाशक हे पुस्तक काढण्यास इच्छुक असल्यास नवल नाही.

भारतातील मोठी व नामांकित प्रकाशन संस्था ‘पेंग्विन’ने पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रणव मुखर्जी, अरुण जेटली व शशी थरूर अशा अनेक बड्यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. मात्र, त्यांचेच ‘ फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ हे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे बहुचर्चित पुस्तक वादांमुळे अजूनही नियम-कायद्यांच्या कचाट्यात अडकून पडले आहे. त्यामुळे पोळलेल्या प्रकाशकांनी संभाव्य वाद-खटले टाळण्यासाठी हा पवित्रा घेतलेला दिसतो. त्यातून लेखकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रकाशकाचे व्यावसायिक अधिकार यांचा प्रश्न ऐरणीवर आला असला, तरी पुस्तकाबाबतची उत्सुकता अधिक वाढली, हे नाकारता येणार नाही.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत