Headlines

Income Tax Return Filing; उरले शेवटचे 2 दिवस! घाईघाईत सबमिट बटण दाबण्यापूर्वी नक्की तपासा या 4 गोष्टी, अन्यथा राखडेल रिटर्न


ITR Filing 2026: सर्वसामान्य करदात्यांना 31 जुलैपर्यंत कोणत्याही शुल्काशिवाय आयकर विवरणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे. त्यानंतर 1 ऑगस्टपासून करदात्यांना 1000 ते 5000 रुपयांपर्यंत स्लॅबनुसार दंड आकारला जाईल. अशा परिस्थितीत, अजूनही नोकरदार करदात्यांकडे आयटीआर दाखल करण्यासाठी 48 तास किंवा दोन दिवस शिल्लक असून बहुतेक लोक घाईघाईने आपले रिटर्न भरतात. पण केवळ रिटर्न भरणे पुरेसे नाही. ‘Submit’ बटण दाबण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासल्यास परतावा मिळण्यास होणारा विलंब, नोटिसा किंवा रिटर्न पुन्हा भरावे लागणे यांसारख्या समस्या टाळता येऊ शकतात.

तुम्ही योग्य ITR फॉर्म निवडला आहे का?

सर्वप्रथम तुमच्या उत्पन्नानुसार योग्य आयटीआर फॉर्म निवडला आहे की नाही याची खातरजमा करा. चुकीचा फॉर्म भरल्यास तुमचा रिटर्न डिफेक्टिव मानला जाईल. तसेच पॅन, आधार, बँक खाते, मोबाईल नंबर आणि ई-मेल ॲड्रेस अचूक दाखल केल्याचीही खात्री करून घ्या.

Maharashtra Times8th Pay Commissionचा अंतिम अहवाल कधी? सरकारवर शिफारशींचे बंधन नाही, पगारवाढीचे काय? एरियरवरही प्रश्नचिन्ह
तुमचा रिटर्न सबमिट करण्यापूर्वी तुमच्या आयटीआर फॉर्म, पॅन, बँक खाते, उत्पन्न, टीडीएस, AIS, फॉर्म 26एएस, कर कपात आणि टॅक्स इनव्हॉइसशी संबंधित सर्व माहिती पुन्हा एकदा तपासा, ज्यामुळे भविष्यातील समस्या टाळता येतील.

AIS, TIS आणि फॉर्म 26AS मधील माहिती जुळवा

आयकर विवरणपत्र भारण्यापूर्वी AIS, TIS आणि फॉर्म 26AS मध्ये नोंदवलेली माहिती तुमच्या ITR शी जुळत असल्याची खात्री करा. पगार, बँकेचे व्याज, भांडवली नफा, शेअर व्यवहार आणि TDS नोंदी अचूक असल्या पाहिजे. कोणतीही विसंगती आढळल्यास प्रथम त्या दुरुस्त करा आणि नंतर तुमचा रिटर्न भरा.

Maharashtra TimesFitment Factor Hike: फिटमेंट फॅक्टर 3 पेक्षा जास्त असणार? कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या, पगारवाढीबाबत नवीन अपडेट; वेतन आयोगाकडे नजर
प्री-फाइल्ड ITR वर अवलंबून राहू नका

तुमच्या आयटीआरमध्ये आधीच भरलेल्या माहितीवर गाफील राहू नका. कर कपातीसाठी आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असल्यासच दावा करा. भांडवली नफ्याचे अचूक कॅलक्युलेशन करा, कोणतेही करमुक्त उत्पन्न असल्यास त्याचाही आयटीआर फॉर्ममध्ये समावेश नक्की करा. अचूक रिटर्न भरण्याची कायदेशीर जबाबदारी तुमची आहे, प्रणालीची नाही.

Maharashtra TimesPaytm Payments बँक अखेर बंद होणार! काय सुरू राहिल काय नाही; UPI, फास्टॅग यूजर्ससाठी अपडेट; जाणून घ्या सर्वकाही

ई-सत्यापन करायला विसरू नका

आयकर विवरणपत्र दाखल केल्यावर ‘सबमिट’ बटणावर क्लिक करताच आपलं काम पूर्ण झालं, असा अनेकांचा समज असतो पण, तसं नाही. केवळ ITR वेळेवर दाखल करणं पुरेसं नाही तर, विहित वेळेत ई-व्हेरिफाय करणेही आवश्यक आहे. तुम्ही तुमचा आयटीआर तुम्ही ई-व्हेरिफाय केले नाही, तर आयकर विभाग सामान्यतः रिटर्न कधी दाखलच केला नाही असं मानतो.

म्हणून ‘सबमिट’ बटण दाबण्यापूर्वी काही मिनिटे वेळ घ्या आणि सर्व माहिती पुन्हा एकदा तपासा जेणेकरून भविष्यात कोणताही मोठा त्रास होणार नाही.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत