Housing Society Rules: फ्लॅट किंवा अपार्टमेंट खरेदी केल्यावर तुमच्या बाल्कनीला ग्रील, काच, रेलिंग किंवा शेड लावण्यासाठी सोसायटीच्या परमिशनची गरज असते का? असे बदल करण्यापूर्वी सोसायटीचे नियम, महानगरपालिकेचे नियम आणि आवश्यक परवानग्या तपासणे महत्त्वाचे आहे.

फ्लॅटमध्ये बदल करताना नियम काय
बरेच लोक आपल्या फ्लॅटमध्ये, विशेषतः नवीन घरात शिफ्ट होताना आपल्या शेजारी किंवा इतर ठिकाणच्या बाल्कनी पाहून स्वतःच्या बाल्कनीत बदल करतात. याबद्दल अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले की, नियम आणि परवान्यांचे पुनरावलोकन न करता अशाप्रकारचे बदल केल्यास कायदेशी वाद होऊ शकतात. त्यामुळे, न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फ्लॅट मालक परवानगीशिवाय कोणते बदल करू शकतात याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत.
Gold Silver Rate: फेडच्या निर्णयानंतर सोने-चांदीच्या दरात मोठी हालचाल; सोन्याला झळाळी; चांदीत मात्र नरमाई, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर
त्याचप्रमाणे, भारतातील घर खरेदीदार आणि फ्लॅट मालकांना या प्रकरणातून महत्त्वाचा संदेशही मिळतो की, फ्लॅटची मालकी तुमच्याकडे असली तरीही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतेही बाह्य बदल करू शकता असं नाही, त्याआधी सर्व नियम समजून घेणे महत्त्वाचे आहे.
फ्लॅटचा मालक मर्जीनुसार कोणताही बदल करू शकतो?
एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान एका फ्लॅट मालकाने बिल्डरने परवानगीशिवाय बांधलेली मोकळी गच्ची झाकली, असे न्यायालयाला आढळून आले. त्यानंतर, कोर्टाने परवानगीशिवाय केलेले असे बांधकाम नियमांच्या विरोधात आहे आणि काढून टाकण्याचे आदेश दिले.
मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले की, फ्लॅट तुमचा असला तरी इमारतीचे अनेक भाग सोसायटीचे नियम, बिल्डर-खरेदीदार करार, महानगरपालिकेचे बांधकाम नियम, अपार्टमेंट कायदे आणि सुरक्षा नियमांच्या अधीन असतात. इमारतीचे बाह्य स्वरूप, रचना, सामायिक जागा किंवा सुरक्षिततेवर परिणाम करणाऱ्या कोणत्याही बदलांसाठी प्राधिकरण किंवा सोसायटीची परवानगी घेतली पाहिजे.
8th Pay Commissionचा अंतिम अहवाल कधी? सरकारवर शिफारशींचे बंधन नाही, पगारवाढीचे काय? एरियरवरही प्रश्नचिन्ह
न्यायालयाने म्हटले आहे की, अनेक फ्लॅट मालक नियमांची माहिती नसताना बाल्कनीवर जाळ्या, स्टेनलेस स्टील काच किंवा छतावर शेड्स बसवतात, किंवा घरातील काही भिंतींमध्ये बदल करतात. अशा बदलांसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्याचे कोर्टाने राज्य सरकारला आदेश दिले जेणेकरून कोणत्या बदलांसाठी परवानगी आवश्यक असल्याचे सर्वसामान्य जनता आणि प्रशासन या दोघांनाही कळेल.
तुम्ही बाल्कनीला सेफ्टी ग्रिल लावू शकता का?
सोसायटीच्या नियम आणि स्थानिक कायद्यांवर हे पूर्णपणे अवलंबून आहे. सोसायटीने परवानगी दिली, ग्रील मंजूर डिझाइननुसार असेल आणि त्यामुळे इमारतीच्या बाह्य स्वरूप किंवा सुरक्षिततेवर परिणाम होत नसेल, तर प्राधिकरण किंवा सोसायटीच्या आदेशानुसार ग्रील लावली जाऊ शकते. म्हणजे केवळ तुमच्या शेजाऱ्याने ग्रील बसवले म्हणून तुम्हालाही परवानगीशिवाय तसे करण्याचा अधिकार आहे, असे नाही.
त्याचवेळी, लक्षात घ्या की बाल्कनीला काच, वीट, ॲल्युमिनियम किंवा छताने पूर्णपणे बंद करणे सेफ्टी जाळीपेक्षा वेगळे असते. यामुळे इमारतीचे बाह्य स्वरूप बदलू शकते, त्यामुळे प्राधिकरण किंवा सोसायटीकडून परवानगी घेतली पाहिजे. मंजूर बांधकाम योजनेच्या विरुद्ध कोणतेही बदल केल्यास तुम्हाला काढून टाकण्यासाठी नोटीस किंवा आदेशही मिळू शकतो.
परवानगीशिवाय बदल करण्याचे धोके
आवश्यक परवानगीशिवाय फ्लॅटमध्ये बाह्य बदल केल्यास महानगरपालिकेची नोटीस, सोसायटीसोबत वाद, कायदेशीर कारवाई, बदल काढून टाकण्याचे आदेश, मालमत्ता विकण्यात अडचणी किंवा कागदपत्रांच्या प्रक्रियेत विलंब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, कोणतेही छोटे-मोठे बदल करण्यापूर्वी नियम आणि आवश्यक परवानग्या तपासून घेणे शहाणपणाचे ठरेल.

