सोलापूरच्या कोरवलीत थरार:शेतातील विहिरीत आढळली महाकाय मगर, वनविभागाकडून सुखरूप रेस्क्यू ऑपरेशन
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोरवली गावात एका शेतातील विहिरीत चक्क एक महाकाय मगर आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सलग दोन दिवस चाललेल्या या थरारानंतर अखेर सोलापूर वनविभागाच्या पथकाने या मगरीला सुखरूप बाहेर काढत नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशननंतर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी मोठा सुटकेचा निःश्वास सोडला आहे. विहिरीच्या कडेलाच बसली होती…
