पर्यावरण संवर्धनात सांगळूदकर महाविद्यालय विभागामध्ये प्रथम:राज्यात तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली ही शिक्षण संस्था
येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था, द्वारा संचालित दर्यापुरच्या जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाने पर्यावरण संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने अत्यंत प्रतिष्ठेचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, महाविद्यालयाने अमरावती विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक, तर राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवून दुहेरी मानाचा बहुमान प्राप्त केला आहे. हा पुरस्कार २०२४ मध्ये…
