Today Major Sports Events News : क्रीडारसिक भारतीयांसाठी आजचा रविवार खऱ्या अर्थाने ‘स्पोर्टस मेजवानी’ देणारा ठरणार आहे. वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत रममाण झालेल्यांना आज, मध्यरात्रीनंतर जगज्जेता लाभण्याची उत्सुकता असेल. पण भारतीय ज्या क्रिकेटवर मनापासून प्रेम करतात त्याच्या निर्णायक लढतीने दुपार सार्थकी लागेल. त्याआधी रविवार सकाळ साजरी होईल ती, देशाची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच्या सामन्याने.

रोहित लॉर्ड्स गाजवणार ?
रोहित शर्मा आणि भारतीय संघासाठी लॉर्ड्सवर आज रंगणारा वनडे क्रिकेट सामना महत्त्वाचा आहे. ही लढत जिंकून इंग्लंड दौऱ्याचा समारोप मालिकाविजयासह करण्यास टीम इंडिया उत्सुक आहे, तर आपली वनडे कारकीर्दीला ‘एक्स्टेंशन’ देण्यासाठी ३९ वर्षीय रोहित शर्मा प्रयत्नशील असेल. जिओ हॉटस्टार आणि सोनी स्पोर्टसवर ३.३० पासून पाहता येईल.
Rohit Sharma : रोहितबद्दल चिंता नाही! इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वनडेपूर्वी हिटमॅनवर कोचने विश्वास दाखवला, 2027 वर्ल्डकपबाबत काय म्हणाले?
जपानमध्ये विक्रमाची अपेक्षा
आव्हानात्मक जपान ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरण्याची संधी पी. व्ही. सिंधूला आहे. आज, अंतिम फेरीत सिंधूपुढे कडवे आव्हान असेल ते अकाने यामागुची या यजमान जपानच्या प्रतिस्पर्धीचे. ही लढत जिओ हॉटस्टारवर सकाळी ८.२० पासून बघता येईल.
Erling Haaland : विश्व फुटबॉलचा नवीन हिरो, नॉर्वेचं ‘गोल मशीन’, एर्लिंग हालँड नेमका कोण? पोरानं बापाचं नाव काढलं, संपूर्ण प्रवास जाणून घ्या
ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधू ही जपान ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारी पहिली भारतीय महिला ठरली. उपांत्य सामन्यात सिंधू २१-१९, १५-१० अशी आघाडीवर होती, त्या वेळी तिची प्रतिस्पर्धी चेन युफेई (चीन) हिने दुखापतीमुळे माघार घेतली. जवळपास दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीनंतर सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ऑलिम्पिक विजेत्या युफेईला पायाच्या दुखापतीमुळे सामना सोडावा लागला. ‘माझ्यासाठी स्पर्धेतील प्रत्येक सामना खूप महत्त्वाचा होता, विशेषतः उपांत्य सामना. या लढतीच्या सुरुवातीपासूनच प्रत्येक गुणावर लक्ष. क्रमवारीत तुमच्यापेक्षा पुढे असणाऱ्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध दोन हात करता तेव्हा प्रत्येक गुण महत्त्वाचा असतो, त्यामुळे सामन्यातील पहिली गेम जिंकून सकारात्मक सुरुवात लाभणे निर्णायक होते,’ असेही सिंधू म्हणाली.
FIFA WC Final : अमेरिकेत नेमकं काय झालंय? अनेक राज्यांमध्ये धूरच धूर, FIFA वर्ल्ड कप फायनल मॅचवर परिणाम होण्याची शक्यता, जाणून घ्या कारण
- आज, रविवारी जेतेपदाच्या लढतीत सिंधूला आव्हान असेल ते जपानच्या अकेन यामागुची हिचे.
- यामागुचीने उपांत्य सामन्यात इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वर्दानी हिची झुंज ९-२१. २१-१६, २१-१४ अशी मोडून काढली.
- एकूण सामन्यांत यामागुची हिचे सिंधूवर १४-१० असे वर्चस्व
- प्रतिस्पर्धीमधील गेल्या सहापैकी पाच लढतींत सिंधूचा पराभव

