पुरामुळे मालखेड-वडगाव रस्त्यावरील पूल वाहून गेला:नागरिकांची गैरसोय; तात्काळ दुरुस्तीची मागणी
अंजनगाव बारी प्रतिनिधी: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंजनगाव बारी परिसरातील वडगाव (जिरे) येथील रायधोळ नदीला पूर आला आहे. या पुरामुळे वडगाव (जिरे)-मालखेड मार्गावरील पूल आणि स्मशानभूमीकडे जाणारा शेतकऱ्यांचा रस्ता वाहून गेला आहे. यामुळे शेतकरी, विद्यार्थी, पादचारी आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी…
