Headlines

August 2026 OTT Release: अ‍ॅक्शन, वॉर ड्रामा, रोमान्स आणि थ्रिलर, या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होतायत भन्नाट चित्रपट आणि वेब सीरिज; या मराठी सिनेमाची झालेली बरीच चर्चा


मुंबई: गेल्या काही आठवड्यात वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता हे सिनेमे घरबसल्या पाहता येणार आहेत. या आठवड्यात आणि येत्या काही दिवसांत चर्चेत राहिलेले सिनेमे ओटीटीवर रिलीज होत आहे. हिंदी सोबतच मराठी सिनेमांचीही ओटीटी रिलीजची प्रेक्षकांना उत्सुका होती, ते सिनेमे आता ओटीटीवर पाहता येणार आहेत.

७ ऑगस्ट २०२६ च्या शुक्रवारी ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर एकापेक्षा एक धमाकेदार चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज झाल्या.

नेटफ्लिक्स, जिओहॉटस्टार, अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओआणि झी५ (Zee5) यांसारख्या प्रमुख प्लॅटफॉर्म्सवर अ‍ॅक्शन, वॉर ड्रामा, रोमान्स आणि थ्रिलरने भरलेल्या ७ नवीन कलाकृती भेटीस आल्या आहेत.

१. ऑपरेशन सफेद सागर

वॉर आणि अ‍ॅक्शन ड्रामा असलेली ही वेब सीरिज आहे. १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाई दलानं राबवलेल्या ऐतिहासिक लष्करी मोहिमेवर आधारित हीदेशभक्तीपर सीरिजआहे. सिद्धार्थ, जिमी शेरगिल आणि अभय वर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेली ही सीरिज हवाई दलाच्या शूरवीरांचा थरारक प्रवास दाखवतो. सीरिज नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

२. मै वापस आऊंगा

इम्तियाज अलीदिग्दर्शित हा चित्रपट १९४७ च्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित हा सिनेमा चांगलाच चर्चेत राहिला. प्रेक्षक तसंच समीक्षकांनाही सिनेमाचं कौतुक केलं आहे. यात नसरुद्दीन शाह, दिलजीत दोसांझ, शर्वरी वाघ आणि वेदांग रैना या कलाकारांच्या दमदार भूमिका आहेत. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.

३. द सुपर मारिओ गॅलक्सी मूव्ही

थिएटर्समध्ये तुफान यश मिळवल्यानंतर हा अ‍ॅनिमेटेड ब्लॉकबस्टर चित्रपट आता जिओहॉटस्टारवर उपलब्ध झाला आहे. मारिओ, लुईगी आणि त्यांचे मित्र प्रिन्सेस रोझालिनाला वाचवण्यासाठी अवकाशात एका नव्या थरारक मोहिमेवर निघतात.

४. वधांधी- सीझन २

पहिल्या सीझनच्या प्रचंड यशानंतर ‘वधांधी’चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. एम. ससीकुमार यांच्या मुख्य भूमिकेतील ही क्राईम थ्रिलर सीरिज एका पोलीस अधिकाऱ्याच्या आणि ग्रामीण भागातील एका गुंतागुंतीच्या गुन्ह्याच्या तपासाभोवती फिरते. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर ही सीरिज पाहता येईल.

Maharashtra TimesShweta Tiwari on ex Husbands: ‘दोन्ही नवऱ्यांना फसवणूक करताना पकडलेलं’, राजा चौधरीच्या आरोपानंतर अभिनेत्री श्वेता तिवारीचा गौप्यस्फोट
५. लेनिन

अखिल अक्किनेनीची मुख्य भूमिका असलेला हा तेलगू अ‍ॅक्शन चित्रपट झी५ डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. तीन दशकांची कहाणी आणि गावातील राजकीय-कौटुंबिक संघर्षाची नाट्यमय पार्श्वभूमी प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

६. अवर स्टिकी लव्ह

के-ड्रामा प्रेमींसाठी हा १२ भागांचा एक उत्कृष्ट रोमँटिक शो आहे. जंग हे-इन आणि हा-यंग यांच्या मुख्य भूमिका असलेला हा शो स्मृतीभ्रंश झालेल्या एका सरकारी वकिलाची आणि तिचे रक्षण करणाऱ्या बॉक्सिंग कोचची गोड आणि रंजक प्रेमकथा दाखवतो.

Maharashtra TimesSalman Khanच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’बाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

Sachin Deshpande Interview : रिल्स स्टारमुळे आम्हाला कोणी विचारत नाहीये, सचिन देशपांडेंची खदखद

७. तुंबडची मंजुळा

झी५ वर तुंबाडची मंजुळा‘ हा हॉरर-कॉमेडी मराठी चित्रपट रिलीज झाला आहे. कोकणातील गूढ वातावरण, मालवणी बोलीचा गोडव आणि त्याला मिळालेली भयपट अन् विनोदाची जोड यामुळं ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाची सिनेसृष्टीत चर्चा झाली.

विविध कोरगावकर दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांना एका अनोख्या, थरारक आणि तितक्याच मनोरंजक सफरीवर घेऊन जातो.

८. भारत भाग्य विधाता

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची मुख्य भूमिका असलेला आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील परिचारिकांच्या धैर्यावर आधारित ‘भारत भाग्य विधाता’ हा बहुचर्चित चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर डिजिटल स्ट्रीम होणार आहे.

९. द महाराष्ट्र फाईल्स

उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, या लोकप्रिय कलाकारांच्या भूमिका असलेला द महाराष्ट्र फाईल्स हा सिनेमाही आता अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर उपलब्ध झाला आहे.

१०.तर नेटफ्लिक्सवर ‘द लास्ट हाऊस’ हा थरारक सायं-फाय हॉरर चित्रपट प्रदर्शित झाला असून थ्रिलर आवडणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय ठरत आहे.

११.गव्हर्नर:

तसंच जून महिन्यात प्रदर्शित झालेला ‘गव्हर्नर: द सायलेंट सेव्हियर’ हा सिनेमाही तुम्ही ओटीटीवर पाहू शकता. १९९० च्या दशकातील भारताच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटावर आणि देशाची अर्थव्यवस्था सावरणार्‍या रिझर्व्ह बँकेच्या तत्कालीन गव्हर्नर एस. वेंकटरमणन यांच्या योगदानावर हा सिनेमा आधारित आहे. अॅमझॉन प्राइम व्हिडिओवर हा सिनेमा पाहता येईल.

तर बटवारा १९४७ हा सिनेमा या आठवड्यात थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजकुमार संतोषी दिग्दर्शित हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सनी देओल (‘सिकंदर मिर्झा’च्या कणखर भूमिकेत), शबाना आझमी (‘दुर्गावती देवी’), प्रीती झिंटा (‘हमीदा बेगम’), अली फझल, अभिमन्यू सिंग आणि करण देओल महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत