Aston Martin Vanquish 2025 Price Features: लक्झरी कार निर्माता Aston Martin ने इंडियन मार्केटमध्ये नवीन सुपरकार Vanquish (Vanquish 2025) लाँच केली आहे, चला या कारचे फीचर्स आणि इतर डिटेल्स जाणून घेऊया.

दर वर्षी बनणार 1000 युनिट
Aston Martin च्या या सुपरकारचे प्रोडक्शन लिमिटेड असेल आणि दरवर्षी 1000 पेक्षा कमी युनिट्स बनवले जातील. Vanquish 2025 विशेषतः लक्झरी आणि परफॉर्मन्स हव्या असलेल्यांसाठी डिझाइन केलेली आहे.
पॉवरफूल इंजिन आणि परफॉर्मन्स
या कारमध्ये 5.2-लिटर ट्विन-टर्बो V12 इंजिन आहे जे 835 पीएस पॉवर आणि 1000 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन आत्तापर्यंतचे पॉवरफूल इंजिन आहे. या इंजिनची खासियत म्हणजे हे इंजिन प्रति लिटर 160 पीएस पॉवर डेन्सिटी देते.
डिझाइन आणि एयरोडायनॅमिक्स
या कारच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, या कारमध्ये मॉर्डन आणि एलिगेंसचे mixture आहे. कारचा व्हीलबेस 80 मिमीने वाढवण्यात आला आहे, ज्यामुळे बोनेट आणखी लाँग आणि Attractive दिसते. या कारची फ्रंट ग्रील मोठी करण्यात आली आहे, ज्यामुळे याच्या मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्समध्ये नवीन लाइट सिग्नेचर आहे, जे रात्रीच्या वेळी देखील चांगला परफॉर्मन्स देते. सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यात पॅनोरॅमिक ग्लाल रुफ आहे.
लग्झरी आणि इंटिरियर
Aston Martin Vanquish 2025 च्या इंटिरियबद्दल बोलायचे झाल्यास, या कारचे इंटिरियर फूल्ली ड्रायव्हर फोकस आहे. ही कार 2-सीटर फ्लॅगशिप मॉडेल आहे, जी मॉर्डन टेक्नोलॉजी आणि जबरदस्त क्राफ्ट्समॅनशिपचे कॉम्बिनेशन आहे. तसेच सेंटर कन्सोलला नवीन डिझाइन करण्यात आले आहे. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात 10.25-इंचाचा कस्टमायझ अॅडस्टेबल डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 10.25 -इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सपोर्ट आहे. नवीन ग्लास इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण आणि मेकॅनिकल ड्राइव्ह मोड डायल सारखी फीचर्स यामध्ये आहे. जर तुम्हाला अल्ट्रा-लक्झरी आणि हाय-परफॉर्मन्स सुपरकार्सची आवड असेल तर ही कार तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असेल.
चेसिस आणि सस्पेंशन
Vanquish 2025 मध्ये नवीन चेसिस स्ट्रक्चर आहे जे आधीपेक्षा स्ट्राँग आणि हलके आहे. यात 21-इंच बनावट अलॉय व्हील्स आणि Pirelli P ZERO™ टायर्स आहेत.

