Headlines

Assam Vidhan Sabha आसामच्या विधानसभेचं कामकाज आता हिंदीतूनही, ६ जुलैपासून होणार अंमलबजावणी


आसाम विधानसभेने शासकिय कामकाजासाठी अधिकृत भाषा म्हणून हिंदीचा समावेश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आसाम राज्यात हिंदी भाषेचा वापर पहिल्यांदाच करण्यात येत आहे. 

आसाम विधानसभेचे अधिवेशन ६ जुलैपासून

६ जुलैपासून आसाम विधासभेचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार असून या दिवसापासून आसामच्या विधानसभेत हिंदीचा वापर अधिकृतपणे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आसाम विधानसभेचे अध्यक्ष रणजीत कुमार यांनी दिली. हा उपक्रम सभापती रणजित कुमार दास यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. आसामी, इंग्रजी आणि बोडो या भाषांसोबतच, १६ व्या आसाम विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस, ६ जुलैपासून हिंदीचाही कामकाजात अधिकृतपणे समावेश केला जाईल.

दास म्हणाले की, शनिवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आसाम विधानसभेच्या सर्वसाधारण उद्देश समितीच्या बैठकीत हिंदी भाषेचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आसाम विधानसभेचे अध्यक्ष रणजीत कुमार दास यांनी रविवारी सांगितले की, “संसदीय कामकाज मंत्री पिजूष हजारिका, मंत्री केशब महंता, विरोधी पक्षनेते वाजेद अली चौधरी, आमदार कमलाख्या डे पुरकायस्थ, सबाराम बसुमातारी, चक्रधर गोगोई आणि जयप्रकाश दास बैठकीला उपस्थित होते.”



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत