मनोरंजनाच्या विविध माध्यमांमधील आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री अश्विनी महांगडे हिनं आपल्या सहजसुंदर अभिनयानं वेगळा ठसा उमटवला आहे. ग्लॅमरस विश्वात आत्मविश्वासानं वावरत असतानाच अश्विनी पसरणी या तिच्या गावातल्या शेतातही तितकीच रमते. या दोन्ही टोकाच्या भूमिकांचा सुरेख समतोल ती नेहमीच साधताना दिसते. अभिनेत्री आणि शेतकरी या तिच्या अनोख्या भूमिकांबद्दल आणि मातीशी असलेल्या नात्याबद्दल अश्विनीनं ‘मुंटा’शी खास संवाद साधला.
लहानपणापासूनच आई-वडिलांना शेतात घाम गाळताना पाहिल्यामुळे मातीशी तिची नाळ आपसूकच जोडली गेली. ‘शाळेत असताना कुटुंबाला गरिबीतून सावरणारं टोमॅटोचं पीक असो वा बाबांची हळदीच्या शेतीची आवड, यानं मला शेतीचं मोल शिकवलं. अभिनयाच्या कमाईतून गावी स्वतःच्या हक्काची शेतजमीन खरेदी करत मी माझं स्वप्न पूर्ण केलं. आज आमच्या शेतात हळद, ऊस, ज्वारी आणि सोयाबीनसारखी पिके डोलतात’, असं अश्विनी सांगते.
Viju Mane Interview: चित्रपट चालला नाही तर आरशात बघा, ती चूक निर्माते, दिग्दर्शकाची; प्रेक्षकांकडे बोट दाखवण्याचं नाही; स्पष्टच बोलले विजू मानेमुंबईतल्या चित्रीकरणाच्या धावपळीतून दोन-तीन दिवसांची सुट्टी मिळाली, तरी अश्विनी थेट गावी धाव घेते. गावी गेल्यावर ती कोणतीही ‘सेलिब्रिटी’ नसून कुटुंबातील एक मुलगी असते. गोठा साफ करण्यापासून ते पिकांची निगा राखण्यापर्यंत सर्व कामं ती आवडीनं करते. ‘आई, भाऊ आणि वाहिनी शेतीची मुख्य धुरा सांभाळतात, त्यामुळे मी मुंबईत असते तेव्हा मला कसलीच चिंता नसते. मी तिथे फक्त एक मदतनीस म्हणून काम करते’, असं तिनं सांगितलं.
अवकाळी पाऊस असो वा बाजारातले चढ-उतार, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसूनही शेतकरी जसा पुन्हा नव्यानं उभा राहतो, तीच जिद्द अश्विनीमध्येही दिसते. यंदा पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाबद्दल ती हळहळ व्यक्त करते; पण त्याच वेळी बळीराजाच्या चिकाटीचं कौतुकही करते.
अभिनय आणि शेती दोन्हीचा समतोल साधण्याबाबत ती म्हणते, ‘इच्छा आणि आवड असेल, तर दोन्ही गोष्टी सांभाळायला आपोआप वेळ मिळतो. अभिनय हे माझं कामाचं क्षेत्र आहे, पण शेती हे माझं मूळ ! पडद्यावर अभिनय करताना मला ओळख मिळते, पण शेतात मातीत पाय रोवून उभं राहिल्यावर मला अंतरात्म्याचं समाधान मिळतं.
Salman Khan Property Deal: एका वर्षात दुसरी प्रॉपर्टी डील, सलमान खानने विकला वांद्र्यातला अलिशान फ्लॅट, इतक्या कोटींना झाला व्यवहार
“शेती हा केवळ एक व्यवसाय किंवा छंद नसून तो एक संस्कार आहे. हजारो रुपये खर्च करून मेडिटेशनचा एखादा कोर्स करण्यापेक्षा शेताच्या बांधावर बसून शांत हिरवळ बघत बसणं, हेच माझं खरं मेडिटेशन आहे. शेतात काम करताना हाताला कितीही फोड आले, तरी त्या कष्टातून मिळालेलं पीक जे समाधान देऊन जातं, ते कशातच नाही.

