Headlines

ashadhi wari 2026 1400 dindi 20000 grant maharashtra government; वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने 2.80 कोटींचा निधी मंजूर केला; दिंड्यांना किती अनुदान मिळणार?


Ashadhi Ekadashi 2026 : पंढरीच्या वारीची तयारी वेगात सुरू असताना राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशी वारीत सहभागी होणाऱ्या १,४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार असून यासाठी २.८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ashadhi wari dindi 20000 grant maharashtra government
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : आषाढी एकादशी वारीच्या तयारीला वेग आला असून राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरकडे जाणाऱ्या १,४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेसाठी २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला. ही माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. सध्या पंढरीच्या वारीला प्रारंभ झाला आहे. बुलढाण्यातून श्री संत गजानन महाराजांची पालखी मार्गस्थ झाली असून जळगावहून संत मुक्ताईंच्या पालखीचेही प्रस्थान झाले आहे. दुसरीकडे, लाखो वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी शासनानेही तयारी सुरू केली असून विविध विभागांच्या समन्वयाची आढावा बैठक घेण्यात आली आहे.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि सामाजिक समतेचा महत्त्वाचा वारसा आहे. दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरच्या वारीत सहभागी होत असल्याने त्यांच्या सुविधांसाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. याच उद्देशाने २०२४ मध्ये मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. या महामंडळामार्फत सलग तिसऱ्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य दिले जात आहे.

यंदा मानाच्या दहा पालख्यांसोबत पंढरपूरकडे जाणाऱ्या १,४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेसाठी लागणारा २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने उपलब्ध करून दिला आहे. अनुदानाचे वितरण मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत करण्यात येणार असून त्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे प्रशासकीय जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Maharashtra TimesMSRTC : एसटी महामंडळाकडून एका झटक्यात थेट 12 अधिकारी निलंबित, कोणत्या विभागांत कारवाई?

वारीची लगबग सुरू

राज्यात मान्सून सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्यांना वेग आला आहे. त्याचवेळी आषाढी वारीची चाहूलही लागली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरीच्या दिशेने निघू लागले आहेत. यंदा २५ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

देहू येथून श्री संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थानही लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शासनाने विविध सुविधा आणि नियोजनावर भर दिला असून, वारकरी परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आर्थिक तसेच प्रशासकीय पातळीवर आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा