Headlines

Ashadhi Wari: पंढरीच्या वाटेवरी पाच वर्षे आरोग्यवारी; नाशिकचे ‘सुयोग’ 50 हजार वैष्णवांची करणार सेवा – nashik dr suyogkumar bhavre providing healthcare services to warkari during pandhari wari for 5 consecutive yrs


Ashadhi Wari 2026: वारीतील सेवेच्या या वाटेवरची सुरुवात खडतर असल्याचाही अनुभव डॉ. सुयोगकुमार यांनी ‘मटा’शी बोलताना मांडला.

आषाढी वारी
आषाढी वारी(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
जितेंद्र तरटे, नाशिक : मुखी नाम अन् डोईवर तुळस किंवा स्वत:च्याच वाणसामानाचे ओझे घेऊन शेकडो मैल अंतर केवळ पाऊलांच्या बळावर कापणाऱ्या वैष्णवांच्या आरोग्यासाठी मूळ नाशिककर असणारे एक डॉक्टर पंढरीच्या वारीत सलग पाच वर्षांपासून अथक धावत आहेत.

पंढरीनाथाच्या दर्शनाच्या ओढीने आसुसलेल्या नजरांना स्वत:चे आरोग्य, तळापायीचे फोड-जखमा अन् कुठलेही दुखणे लगाम घालत नाही. अशा वैष्णवांच्या सेवेसाठी आयफेलो फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुयोगकुमार भवरे यांनी सेवाभावी सहकाऱ्यांद्वारे यंदाच्या वारीत तब्बल ५० हजार वैष्णवांच्या सेवेचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Maharashtra TimesBhavali Dam: पर्यटक हल्ल्यानंतर भावली धरणालगत थेट ‘दंगल नियंत्रण’; पोलिसांची कडेकोट सुरक्षा, हुल्लडबाजांना चोप
सलग पाच वर्षांपासून डॉ. सुयोग यांची ‘आरोग्यवारी’ त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत सुरू आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पूरक साधनांची अनुपलब्धता आणि उपलब्ध मनुष्यबळावरच आरोग्य वारीचा संकल्प त्यांनी सोडला. यानंतर दरवर्षी अखंडितपणे दोन ते तीन आठवडे वारीमध्ये आरोग्यसेवेद्वारे योगदान देण्याचा संकल्प ते पूर्ण करीत आहेत. डॉ. भवरे व संपूर्ण टीम लोणंद ते पंढरपूर, जेजुरी ते वाखरी या पालखी मार्गावर दिवसरात्र मोफत वैद्यकीय सेवा पुरवत आहे.

यंदादेखील १३ जुलै ते २४ जुलै २०२६ दरम्यान चालणाऱ्या या ११ दिवसांच्या प्रवासात ही टीम वारकऱ्यांसाठी अहोरात्र राबत आहे. फक्त प्राथमिक उपचार नाही, तर मिलिटरीच्या धर्तीवर रुग्णालय उभारून हजारो वारकऱ्यांना औषधे, आपत्कालीन उपचार, सलाइन आणि इंजेक्शन्स दिली जात आहेत.

Maharashtra TimesGirish Mahajan: ठाकरेसेनेत तुम्ही तिघंच जण राहाल! गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना टोला
लोकसहभागातून उभी राहिलेली ‘सेवायात्रा’
लाखो वारकऱ्यांसाठी शासनासह असंख्य सेवाभावी संस्थांचेही सेवाकार्य असताना पुरेशी साधने व मनुष्यबळाशिवाय आपण वेगळी सेवा काय करणार, असाही प्रश्न काहींनी उभा केला होता. मात्र, वैष्णवांची सेवा म्हणजे श्री विठ्ठलांची सेवा या भाववेने आयफेलो फाउंडेशनच्या प्रत्येक सहकाऱ्याने योगदान दिले अन् आता या कार्यास आकार येण्यास सुरुवात झाल्याचे डॉ. सुयोगकुमार यांनी सांगितले. यंदा वैद्यकीय क्षेत्रातील काही संस्थांच्या वतीनेदेखील सामाजिक दायित्वाच्या निधीद्वारे औषधे व वैद्यकीय सेवेची उपयोगी साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा