Headlines

Ann Walton Kroenke and Nancy Walton Laurie Lifestyle; वॉलमार्टच्या अब्जाधीश घराण्याच्या वारसदार लेकी! एकीकडे 2800 कोटींची सुपरयाट तर दुसरीकडे वॉशिंग्टनपेक्षा 13 पट मोठा भूखंड

World’s Richest Heiress: अमेरिकेतील वॉलमार्ट कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत मानलं जातं. अफाट संपत्तीच्या मालक असलेल्या या वॉलमार्टच्या वारसदारांपैकी दोन बहिणींनी आयुष्यात दोन भिन्न-भिन्न मार्ग निवडले. एक बहीण समुद्रांवर राज्य करते, तर दुसऱ्या बहिणीने अनेक शहरांच्या एकत्रित क्षेत्रापेक्षाही मोठे जमिनीवर साम्राज्य उभारले आहे.

Ann Walton Kroenke and Nancy Walton Laurie Superyatch Tranch
ॲन वॉल्टन क्रोनके आणि नॅन्सी वॉल्टन लॉरी
Walmart Heiress Story: जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी, Walmart, संस्थापकांच्या अब्जाधीश बहिणी आणि मुली सध्या चर्चेत आहे. जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून मिरवणाऱ्या वॉलमार्ट साम्राज्याच्या वारसदार दोन सख्ख्या बहिणी पूर्णपणे भिन्न-भिन्न आयुष्य जगत आहे. एक बहीण समुद्रावर वर्चस्व गाजवत आहे तर दुसऱ्या बहिणीने जमिनीवर अनेक देशांतील शहरांपेक्षाही मोठे साम्राज्य उभारले आहे.

हजारो कोटींच्या वारासदारांची वेगवेगळी दुनिया

हजारो कोटींच्या वारासदारांची वेगवेगळी दुनिया

वॉलमार्टच्या वारसदार – नॅन्सी वॉल्टन लॉरी – $300 दशलक्ष (सुमारे 2500 कोटी रुपये) किमतीच्या ‘Kaos’ या आलिशान सुपरयॉटसाठी ओळखल्या जातात. दुसरीकडे, त्यांची मोठी बहीण ॲन वॉल्टन क्रोनके, वॉशिंग्टन डी.सी पेक्षा 13 पटीने मोठ्या अशा आलिशान टेक्सास रँचच्या मालक आहेत. या प्रचंड मोठ्या फार्महाऊसचा आकार इतकं भव्य आहे की तिथे गायींना चरायला नेण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. ॲन यांचे टेक्सासमधील 6 काउंटींमध्ये पसरलेले ‘वॅगनर रँच’ म्हणून ओळखले जाणारे रँच 5,10,527 एकरमध्ये पसरलेले असून येथे अनेक मोठी सरोवरे, डझनभर तेल विहिरी, हजारो गुरे, महागडे घोडे आणि वन्य प्राणी आहेत.

स्टॅन क्रोनके क्रीडा जगातील प्रख्यात व्यक्तिमत्व

स्टॅन क्रोनके क्रीडा जगातील प्रख्यात व्यक्तिमत्व

2016 पासून या आलिशान संपत्तीचे मालकी हक्क ॲन वॉल्टन क्रोनके आणि त्यांचे अब्जाधीश पती, स्टॅन क्रोनके यांच्याकडे आहेत. स्टॅन यांनी या प्रॉपर्टीसह अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध मालमत्तांपैकी एकाच ताबा घेतला. तब्बल $25 अब्जच्या मालमत्तेचे मालक आणि 78 वर्षीय स्टॅन क्रीडा जगतातील प्रमुख व्यक्तिमत्व असून लॉस एंजेलिस रॅम्ससारख्या मोठ्या क्रीडा फ्रँचायझींचे मालक आहेत. स्टॅन आणि ॲन यांच्या लग्नाला 50 वर्षांहून अधिक काळ लोटला असून त्यांच्या या आलिशान मालमत्तेत 1400 एकरांचे खाजगी तलाव, मासेमारीसाठी गुप्त तळी आणि मैलोन् मैल पसरलेले रस्ते आहेत.

एकत्र 14000 गुरे चरू शकतात

एकत्र 14000 गुरे चरू शकतात

वॅग्नर रँच केवळ ऐशोआरामाची जागा नाही तर, एक मोठे शेती आणि पशुपालन केंद्र आहे. या विस्तीर्ण ठिकाणी एकाच वेळी 14,000 पेक्षा जास्त गुरे चरू शकतात. इतक्या मोठ्या ठिकाणी घोडे किंवा पायी चालून जनावरांना सांभाळणे कठीण आहे त्यामुळे, रँचमधील पूर्णवेळ पायलट डेव्हिड ब्रॉकलहर्स्ट जनावरांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी बेल जेटरेंजर हेलिकॉप्टरचा वापर करतात. याशिवाय येथे 25,000 ते 30,000 एकर जमिनीवर लागवड केली जाते.

अमेरिकेतील सर्वात मोठे जमीनदार

अमेरिकेतील सर्वात मोठे जमीनदार

स्टॅन क्रोनके अमेरिकेतील सर्वात मोठे जमीनदार असल्याचे मानले जाते आणि देशभरात त्यांची 27 लाख एकर जमीन आहे. वॅग्नर रँच देखील त्यांच्या या विशाल मालमत्तेचा भाग आहे. त्याउलट ॲन वॉल्टन यांची धाकटी बहीण, नॅन्सी वॉल्टन लॉरी, यांना समुद्राची खूप आवड आहे 1995 मध्ये वडील, जेम्स ‘बड’ वॉल्टन यांच्या निधनानंतर नॅन्सी यांना मालमत्तेचा वारसा मिळाला.

जगातील सर्वात महागडी खाजगी नौका

जगातील सर्वात महागडी खाजगी नौका

नॅन्सी यांच्या मालकीची ‘Kaos’ नौका जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात महागड्या खाजगी नौकांपैकी मानली जाते, जी डच बांधणीची असून 100 मीटर लांबीच्या आलिशान जहाजाचे मूल्य अंदाजे 30 कोटी डॉलर्स आहे. या yatch मध्ये 30 पाहुण्यांना राहण्यांसाठी 15 आलिशान स्वीट्स आहेत. तसेच या नौकामध्ये मौल्यवान संगमरवर, इराणी पांढरा ओनेक्स दगड, 1 स्विमिंगपूल, एक स्पा, हेलिपॅड, थिएटर आणि मोठे मत्स्यालय आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा