Headlines

Anita Advani : ‘राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडियाकडे घटस्फोट मागितलेला, पण तिची मोठी अट होती’, सुपरस्टारच्या एक्स-गर्लफ्रेंडचा दावा


Anita Advani : अनिता अडवाणी यांनी एका मुलाखतीमध्ये राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्याबद्दल दावा केला आहे.

Anita Advani On Rajesh Khanna And Dimple Kapadia Divorce
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – राजेश खन्ना हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार मानले जातात. ते आज हयात नसले तरी, त्यांच्या स्टारडमची चर्चा आजही होते. राजेश खन्ना यांची चित्रपट कारकीर्द कमालीची होती, पण त्यांचं वैयक्तिक आयुष्यही नेहमी चर्चेत राहिलं.

आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना, राजेश खन्ना यांनी वयाच्या ३१ व्या वर्षी अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्याशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाच्या वेळी डिंपल फक्त १६ वर्षांच्या होत्या. राजेश खन्ना यांच्याशी संसार थाटल्यानंतर डिंपल यांनी चित्रपटांमधून ब्रेक घेतला. या जोडप्याला ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना या दोन मुली होत्या. मात्र, मुलींच्या जन्मानंतर राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि ते वेगळे झाले. पण, त्यांनी कधीही घटस्फोट घेतला नाही. १९८२ मध्ये डिंपल कपाडिया यांनी राजेश खन्ना यांचं घर सोडलं. त्यानंतर राजेश खन्ना आणि अनिता अडवाणी एकत्र राहू लागले.
Maharashtra TimesUma Hrishikesh : मासिक पाळीदरम्यान वेदना अन् आजाराचं निदान, करावी लागली शस्त्रक्रिया; मराठी अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग

राजेश खन्ना यांच्याबद्दल अनिता अडवाणी यांचा दावा

‘मेरी सहेली’ला दिलेल्या एका मुलाखतीत अनिता यांनी राजेश खन्ना यांच्यासोबतच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडियाकडे अनेक वेळा घटस्फोट मागितला होता, पण डिंपल यांनी नकार दिला, असा दावा अनिता अडवाणी यांनी केला आहे.

Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा

डिंपल कपाडिया यांच्यावर टीका करताना अनिता म्हणाल्या की, ‘जर एखाद्या व्यक्तीचं लग्न झालं असेल आणि तो तिच्यासोबत राहत असेल, तर तो दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध ठेवू शकत नाही, असं म्हटलं जातं. पण जर एखाद्याची बायको त्याला सोडून गेली आणि अनेक वर्षे त्यांच्यात मतभेद असतील तर मग त्या पुरुषाच्या आयुष्यात दुसरी स्त्री येते.’
Maharashtra TimesSanjay Dutt : ‘आईला त्या सगळ्यातून जाताना पाहणं असह्य होतं’, नर्गिस यांची कॅन्सरशी झुंज, संजय दत्तनं सांगितला कठीण काळ
अनिता पुढे म्हणाल्या, ‘डिंपल ना राजेश खन्ना यांच्यासोबत राहत होती, ना ती त्यांना घटस्फोट देत होती. राजेश खन्ना यांनी अनेक वेळा घटस्फोट मागितला, पण डिंपलने नकार दिला. जर घटस्फोट घ्यायचा असेल तर सर्व संपत्ती तिला स्वतःच्या नावावर करून पाहिजे होती.’
Maharashtra TimesPrajakta Kulkarni : ‘माझ्यावर खूप प्रेशर होतं’, ‘दामिनी’ सिनेमात अतिप्रसंगाचा सीन; प्राजक्ता कुलकर्णींनी सांगितला शुटिंगचा अनुभव
अनिता म्हणाल्या, ‘राजेश खन्ना यांनी एका मुलाखतीत असंही म्हटलं होतं की, ‘मला घटस्फोट द्यायचा आहे, मी अनेक वेळा विचारलं, पण तिनं दिला नाही. ही अशी कशी बायको आहे मला कळत नाही. मी १० वेळा घटस्फोट मागितला पण तिनं दिला नाही. जर घटस्फोट द्यायचा असेल तर सर्व काही आमच्या नावावर करावं लागेल, अशी डिंपलची अट होती.’

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा