amol-mitkari-emotional-reaction-on-ajit-pawar-death-stole-chappal-story; ‘अजितदादांची चप्पल चोरून आणली आणि घरात पूजा केली’; योद्धा गेला, आता शस्त्रे म्यान केली, मिटकरींची भावूक प्रतिक्रिया
amol-mitkari-emotional-reaction-on-ajit-pawar-death-stole-chappal-story; ‘अजितदादांची चप्पल चोरून आणली आणि घरात पूजा केली’; योद्धा गेला, आता शस्त्रे म्यान केली, मिटकरींची भावूक प्रतिक्रिया
Amol Mitkari breaks down remembering Ajit Dada: ‘आमचा योद्धाच गेला, आता कोणासोबत लढायचं?’; मिटकरींच्या त्या विधानाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले!
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अकोला: “अजितदादांमुळेच माझा राजकीय जन्म झाला. आज आमचा योद्धाच आम्हाला सोडून गेला, आता ही लढाई कोणासाठी लढायची? आम्ही आता आमची शस्त्रे टाकली आहेत,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाचे वृत्त समजताच मिटकरी यांना आपला शोक अनावर झाला.
भाड्याच्या घरापासून आमदारकीपर्यंतचा प्रवास
अजित पवारांनी सामान्य कार्यकर्त्याला कसं मोठं केलं, याची एक भावूक आठवण मिटकरींनी सांगितली. “सहा वर्षांपूर्वी मी भाड्याच्या घरात राहायचो. एके दिवशी दादांचा फोन आला आणि त्यांनी मला आमदार करण्याचं आश्वासन दिलं. माझ्याकडे कागदपत्रे नव्हती, तर दादांनी स्वतः वकील लावून ती तयार करून घेतली आणि मला आमदार केलं,” असे सांगताना मिटकरींच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.
जेव्हा मिटकरींनी चोरली ‘दादांची चप्पल’…
आमदार झाल्यानंतर पाच वर्षांनी मिटकरींनी स्वतःचं घर बांधलं. वास्तुशांतीसाठी त्यांनी अजित पवारांना आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं, पण कामाच्या व्यस्ततेमुळे दादा येऊ शकले नाहीत. “दादा येऊ शकले नाहीत, म्हणून मी देवगिरी बंगल्यावर गेलो आणि कुणालाही न सांगता दादांची चप्पल चोरून आणली. त्या चपलेची मी माझ्या घरात पूजा केली,” ही आठवण सांगताना मिटकरी सुन्न झाले होते.
अजित पवारांच्या निधनाने पोरके झाल्याची भावना व्यक्त करताना मिटकरी म्हणाले, “आता ही राजकीय लढाई संपली आहे. ज्यांच्या बळावर आम्ही लढायचो, तो आमचा सेनापतीच आता राहिला नाही. त्यांनी भाजपसोबत युती केली असली, तरी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार त्यांनी कधीच सोडले नाहीत. त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारी लाखो माणसे आज अनाथ झाली आहेत.”
अजित पवारांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचं नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एका पर्वाचा अंत झाला आहे, अशी भावना मिटकरींनी व्यक्त केली.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा