Amit shah in pune political tensions rise due to congress protests heightened security measures; अमित शाह यांच्या दौऱ्याआधी पुण्यातील राजकारण तापलं; काँग्रेसचा इशारा, पोलीस अलर्ट मोडवर
Amit shah in pune political tensions rise due to congress protests heightened security measures; अमित शाह यांच्या दौऱ्याआधी पुण्यातील राजकारण तापलं; काँग्रेसचा इशारा, पोलीस अलर्ट मोडवर
म. टा. प्रतिनिधी, पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे, या आंदोलनाला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा भाजपने दिल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुणे पोलिस आयुक्तालयात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यानची सुरक्षा व्यवस्था, संभाव्य आंदोलने, कायदा व सुव्यवस्था; तसेच विविध संवेदनशील ठिकाणांवरील पोलिस बंदोबस्त याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही बैठकीत भर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या राजकीय कलगीतुऱ्यामुळे शहरातील वातावरण तापले असून, पोलिस व सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षेचे कडेकोट नियोजन केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सतर्क झाले असून, त्यांच्या ‘व्हीआयपी’ ताफ्याला ‘खड्डे दर्शन’ होऊ नये यासाठी तातडीने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी या संदर्भात तातडीची आढावा बैठक घेऊन शहा यांच्या संभाव्य प्रवासाच्या मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून रस्ते चकाचक करण्याची तंबी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.
ताफ्याचा मार्ग खड्डेमुक्त
या पार्श्वभूमीवर विमानतळापासून ते महर्षीनगरपर्यंत ज्या मार्गाने गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा जाणार आहे, ते सर्व रस्ते खड्डेमुक्त, पॅचमुक्त, स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. शहा हे शुक्रवारी रात्रीच पुणे मुक्कामी येणार असल्याचे समजते. त्यांच्या वाहनांचा ताफा हा महर्षीनगर, स्वारगेट परिसरात जाणार-येणार असल्याने प्रशासनाकडून पुरेशी खबरदारी घेण्यात येत आहे.
सारसबाग परिसरावर लक्ष
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अमित शहा हे सारसबाग परिसरातील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शनिवारी जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सुरक्षा यंत्रणा आणि गर्दीचे नियोजन लक्षात घेता हा कार्यक्रम अद्याप अंतिम झालेला नसला, तरी ऐन वेळी धावपळ होऊ नये; म्हणून स्वारगेट, सारसबाग आणि व्होल्गा चौक परिसरातील रस्तेही सुस्थितीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांकडूनही या पार्श्वभूमीवर पुरेशी तयारी करण्यात आली आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने सामान्य पुणेकर त्रस्त आहेत. मात्र, शहा यांच्या ‘व्हीआयपी’ दौऱ्याच्या निमित्ताने का होईना, प्रशासनाला जाग आली असून, काही भागांतील रस्त्यांना तरी ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे चित्र आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा