Headlines

Alka Kubual Recalled Death Scene In Maherchi Sadi Movie ; तिरडीच्या सीनला मला बांधलेलं , दुसऱ्या दिवशी त्यावर अबीर गुलाल पाहून अंगावर काटा, अलका कुबल यांनी सांगितल्या माहेरची साडी च्या आठवणी


Maherchi Sadi BTS : माहेरची साडी या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवले. एका मुलाखतीत अलका कुबल यांनी सीनदरम्यानच्या आठवणी सांगितल्या.

माहेरची साडी
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मराठी सिनेमाच्या इतिहासात गाजलेला सिनेमा म्हणजे माहेरची साडी. अलका कुबल , विक्रम गोखले, अजिंक्य देव, रमेश भाटकर यांसारखी तगडी स्टार कास्ट असलेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणतो. सिनेमाचे कथानक, कलाकार यामुळे आजही हा सिनेमा चर्चेचा विषय आहे. हा सिनेमा रिलीज होऊन इतकी वर्ष उलटली तरीही कलाकार नव्याने त्याच्या आठवणी शेअर करत असतात.

अभिनेत्री अलका कुबल यांनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. त्या सुद्धा म्हणतात की मी पण हा जेव्हा सिनेमा पाहते तेव्हा खूप रडते. मला तेव्हा वाटतच नाही की त्या सिनेमात मीच होते. मी त्या सिनेमाचा कथानकात इतकी बुडून जाते की मला समजतच नाही , माझ्याही डोळ्यातून पाणी येतं. या सिनेमाच्या आठवणी सांगताना अलका कुबल एका मुलाखतीत म्हणाल्या की, या सिनेमातल्या एका सीन मध्ये मी तिरडीवर झोपणार होते. असला काहीसा सीन मी आयुष्यात पहिल्यांदाच करत होते. तेव्हा मला आमच्या दिग्दर्शकांनी सांगितलं की असा असा एक सीन आहे… तुला हे हे करावे लागेल… साधारण तीन चार तासात हा सीन संपेल. कारण मी त्यामध्ये तिरडीवर मृत्यू अवस्थेत असली तरीही इतरांचे डायलॉग होते.

Maharashtra TimesSubhash Ghai On Salman Khan : त्या पार्टीत सलमानला दारू चढलेली, त्याने मला शिवीगाळ केली, सुभाष घईंनी सांगितली आठवण, पुढे दोघांमध्ये कसा झाला समेट?
अलका कुबल यांनी पुढे सांगितले की, त्यावेळी मला बांधलेलं, डोळ्यांवर ऊन येऊ नये म्हणून वरती छत्री धरलेली, मी फक्त झोपून होते, सगळ्यांकडे बघत होते छान एन्जॉय करत होते. पण नंतर त्या दिवशी नेमकं सगळ्या सूर्यप्रकाश जाऊन वातावरण ढगाळ झालं. त्यामुळे सगळी कंटिन्युटी होती ती बिघडली. मग मला आमचे कॅमेरामन म्हणाले की अलका सॉरी तुला उद्या पुन्हा एकदा तिरडीवर झोपावं लागेल. त्यावर मी त्यांना म्हणाले की चालेल मला काहीही प्रॉब्लेम नाही मी आजचा सीन मस्त एन्जॉय केला आहे. पण दुसऱ्या दिवशी मात्र सीन शूट करताना मला त्या तिरडीवर झोपायला होत नव्हतं कारण काल घातलेली सर्व फुलं अभीर गुलाल तसंच होतं. त्यावेळी मला वाटलं की मी माझंच मरण स्वतःच्या डोळ्यांनी बघते की काय… त्यावेळी मला त्या तिरडीवर झोपवेना. पण दुसऱ्या दिवशी तो सीन मी पटापट संपवला.

Maharashtra TimesChandrachur Singh : काकीने केला घात, तिला आत्याची साथ! अभिनेत्याचे गंभीर आरोप, आजोबांच्या खोट्या सह्या दाखवत हडपली 156 वर्ष जुनी हवेली, 7 जणांविरोधात FIR
याच मुलाखतीमध्ये अलका कुबल यांनी सांगितले की मला या सिनेमामुळे प्रेक्षकांचे प्रचंड अनुभव आले. मी त्यावेळी वेगवेगळ्या जत्रांमध्ये माझ्या फिल्म्स लावायचे. तिथे जायचे तेव्हा बायका अगदी डोळ्यात पाणी घेऊन यायच्या. मला हात लावण्यासाठी मला पाहण्यासाठी आतुर असायचा तेव्हा मला वाटायचं बापरे ईश्वराची काय खूप आहे आपल्यावर! पण या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट मी आमच्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्याने देईन. सुरुवातीला बजेटमुळे मी हा सिनेमा स्वीकारत नव्हते पण पितांबर काळे यांनी मला नीट समजावलं की अलका ही संधी सोडू नकोस. बाहेर तुला भरपूर पैसे वगैरे मिळत असतील पण हा चान्स तू सोडू नये असं मला वाटतं. आणि आज खरोखर मी ते सगळं अनुभवते आहे. लोकमत फिल्मी ला दिलेल्या मुलाखती त्यांनी ही गोष्ट सांगितली.

माहेरची साडी या सिनेमाबद्दल बोलायचे झाल्यास हा सिनेमा 18 सप्टेंबर 1991 मध्ये रिलीज झाला होता. त्या काळात हा सिनेमा थिएटरमध्ये तब्बल 160 आठवडे चालला. अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी या सिनेमात खाष्ट सासूची भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री अलका कुबल या त्यांच्या सूनबाई होत्या. अभिनेते अजिंक्य देव यांनी अलका कुबल यांच्या भावाची भूमिका साकारली होती.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा