Makeup Video Youth who Teased on Train Young Girl : महाराष्ट्रात बडनेरा आणि अकोला दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा विनयभंग करण्याचा तरुणाचा प्रयत्न त्याला महागात पडला. पीडित तरुणीने सर्वांसमक्ष त्याच्या चेहऱ्यावर लिपस्टिक फासली आणि हातात बांगड्या घातल्या.
तरुणीची छेड तरुणाचा रेल्वेत मेकअप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अकोला : महाराष्ट्रातील एका धावत्या ट्रेनचा एक अतिशय अनोखा आणि धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. बडनेरा आणि अकोला दरम्यान धावणाऱ्या ट्रेनमध्ये एका तरुणाने एका तरुणी प्रवाशासोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. सहसा, अशा प्रकरणांमध्ये वाद किंवा हाणामाऱ्या होत्या. परंतु येथे काही वेगळंच घडलं आहे. पीडित तरुणीने आरोपीला धडा शिकवण्यासाठी एक अतिशय अनोखी आणि हास्यास्पद पद्धत निवडली. त्या तरुणीने डब्यातील संपूर्ण प्रवाशांसमोर आरोपी तरुणाचा ‘मेकअप’ केला.
हा व्हिडिओ सोशल मिडियावर आल्यापासून चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडिया वापरकर्ते त्या तरुणीच्या कृतीचं कौतुक करत आहेत आणि अनेकांच्या मते सार्वजनिक ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध हा एक शक्तिशाली तथा प्रतिकात्मक धडा आहे. याव्यतिरिक्त, लोकांनी ट्रेनमधील इतर प्रवाशांनी दाखवलेल्या पाठिंब्याचं कौतुक केलं. या घटनेमुळे सार्वजनिक वाहतूक आणि रेल्वेमधील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. Sachin Ahir : नेत्याच्याच घरी डल्ला, सचिन अहिरांच्या घरात चोरी, 2 कोटी 65 लाखांचा ऐवज लंपास, हिऱ्यांचे दागिने अन् सोन्याचे बिस्किटे गायब
औपचारिक तक्रार करणे आवश्यक
ट्रेनमधील प्रवाशांनी त्या तरुणीच्या कृतीचं कौतुक केलं आणि सोशल मीडियावरही याला पाठिंबा मिळाला आहे. मात्र, अशा प्रकरणांवर कायदेतज्ज्ञांचा दृष्टिकोन वेगळा आहे. तज्ज्ञ आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, विनयभंग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या छळाच्या बाबतीत, घटनास्थळीच कारवाई करण्याऐवजी किंवा पीडितेला सार्वजनिकरित्या फटकारण्याऐवजी कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे अधिक सुरक्षित आणि उचित आहे. तज्ज्ञांच्या मते, पीडित महिलांनी/तरुणींनी तात्काळ रेल्वे पोलिसांकडे (जीआरपी/आरपीएफ) घटनेची माहिती द्यावी आणि गुन्हेगाराविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल करावी, जेणेकरून कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकेल.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा