Headlines

akola corporation election political drama in ward 16 ncp vs mim ishwar chiththi; अजब टॉसची चर्चाच चर्चा; ‘ईश्वर चिठ्ठी’ उघडली अन् एमआयएमचा उमेदवार थेट निवडणुकीच्या रिंगणाबाहेर


प्रियंका जाधव, अकोला: राजकारण म्हटलं की चुरस, ईर्षा आणि एकमेकांचे पाय खेचणे आलेच! पण अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक असा ‘क्लायमॅक्स’ पाहायला मिळाला, जो पाहून भलेभले राजकीय विश्लेषकही चक्रावून गेले आहेत. प्रभाग क्रमांक १६ मध्ये रंगलेलं हे नाट्य कोणत्याही सस्पेन्स थ्रिलरपेक्षा कमी नव्हतं. येथे दोन तगड्या उमेदवारांच्या नशिबाचा फैसला चक्क ‘ ईश्वर चिठ्ठी ‘ने झाला आणि एका उमेदवाराला हसत-हसत माघार घ्यावी लागली.
जेव्हा ‘मतांचे गणित’ आणि ‘समाजहित’ आमनेसामने आले.

प्रभाग १६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि एमआयएम (MIM) या दोन्ही पक्षांनी शड्डू ठोकला होता. दोन्ही उमेदवारांची ताकद तोडीस तोड असल्याने ‘काटे की टक्कर’ निश्चित होती. मात्र, या लढतीत मुस्लिम मतांचे विभाजन होऊन तिसऱ्याचाच फायदा होईल, अशी भीती समाजधुरीणांना वाटू लागली. मग काय? ‘एकता’ टिकवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मैदानात उडी घेतली आणि दोन्ही पक्षांना एकाच टेबलावर आणले.
अन् निघाली ती ‘जादुई’ चिठ्ठी.

बैठकीत चर्चा झाली, खलबतं झाली, पण माघार कुणी घ्यायची? हा प्रश्न सुटता सुटेना. अखेर लोकशाहीच्या या लढाईत ‘दैवाचा’ कौल घेण्याचं ठरलं. एका डब्यात दोन चिठ्ठ्या टाकल्या गेल्या. संपूर्ण प्रभागाचे श्वास रोखले गेले होते. जेव्हा चिठ्ठी उघडली, तेव्हा त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या उमेदवाराचे नाव झळकले.

Maharashtra TimesJalgaon Election: जळगावात भाजपच्या आदेशाची ऐशी-तैशी! निष्ठावंत वाऱ्यावर, आमदारांच्या पुत्राची थेट बिनविरोध निवड

हारूनही जिंकलं एमआयएम

ईश्वर चिठ्ठीचा कौल येताच, एमआयएमच्या उमेदवाराने कोणताही आढेवेढा न घेता शब्दाला जागत आपला अर्ज मागे घेतला. अकोल्याच्या राजकीय इतिहासात ‘चिठ्ठी’ काढून उमेदवारीचा फैसला होण्याची ही पहिलीच वेळ असावी.

दरम्यान, सध्या अकोला महापालिकेच्या गल्लोगल्लीत या ‘इश्वर चिठ्ठी’चीच चर्चा सुरु आहे. उमेदवाराने माघार घेतली असली तरी, समाजहितासाठी घेतलेला हा निर्णय म्हणजे एकीचा विजय आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

आता या चिठ्ठीचा चमत्कार मतपेटीत काय जादू करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत