Headlines

AI Data Centers: AI चा गेम ओव्हर? 79 टक्के डेटा सेंटर्ससमोर ब्लॅकआऊटचं संकट; दिग्गज टेक कंपन्यांना धडकी भरली


AI Data Centers: एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार, सगळी कामं एआय करणार, अशी चर्चा असताना आता एआय डेटा सेंटर्स संकटात सापडली आहेत. त्यामुळे दिग्गज टेक कंपन्यांना धडकी भरली आहे.

ai data centers
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: उकाडा वाढल्यानं देशभरातील जनता त्रस्त झाली. भीषण उष्णतेमुळे युरोपपासून अमेरिकेतील कोट्यवधी लोक त्रासले आहेत. पण उष्णतेमुळे केवळ माणूसच नव्हे, तर एआय च्याही अडचणी वाढल्या आहेत. भीषण उष्णतेमुळे बड्या कंपन्यांची अनेक एआय डेंटा सेंटर्स उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या सेंटर्सना थंडगार ठेवण्याचं आव्हान कंपन्यांसमोर आहे.

उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि एनवीडिया यासारख्या कंपन्यांनी डेटा सेंटरच्या डिझाईनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. डेटा सेंटर्स प्रत्येक ऋतूत थंड ठेवण्यासाठी या कंपन्या कामाला लागल्या आहेत. वाढलेला उकाडा आणि वातावरणात होणारे बदल यामुळे एआय डेटा सेंटर उभारणाऱ्या कंपन्यांचा खर्च कैकपटीनं वाढला आहे.
Maharashtra TimesIndian Sailor Dies: किडनी, हृदय, फुफ्फुस..; व्हेनेझुएलाच्या समुद्रात भारतीय खलाशासोबत घातपात? बॉडीमधून 21 अवयव गायब
एआय डेटा सेंटर्समध्ये अतिशय शक्तिशाली चिपचा वापर होतो. त्या चिप थंड ठेवणं हे मोठं आव्हान आहे. डेटा सेंटर्स कित्येक लाख लीटर पाणी पितात. डेटा सेंटर्स थंड राहिल्यास ती भस्मसात होऊ शकतात. कारण सेंटर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या चिप अतिशय वेगानं गरम होतात. त्यांना कार्यान्वित ठेवण्यासाठी प्रचंड प्रमाणात वीज लागते. एका डेटा सेंटरला लागणारी वीज लाखो घरांमध्ये लागणाऱ्या वीजेइतकी आहे. त्यामुळे भीषण उकाड्यामुळे ब्लॅकआऊटचं संकट निर्माण होण्याचा धोका आहे.

डेटा सेंटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या विजेचा ४० टक्के भाग केवळ चिप्स थंड ठेवण्यासाठी उपयोगात आणला जातो. वाढतं तापमान, हवामान बदल यामुळे डेटा सेंटर्सची विजेची मागणी वाढली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शहरी भागांमध्येही विजेची मागणी वाढते. त्यामुळे पॉवरग्रिडकडे डेटा सेंटर्ससाठी पुरेशी वीज शिल्लक राहत नाही.
Maharashtra TimesEurope Heatwave: भीषण उष्णता, त्यात ‘सायलेंट किलर’चा धोका; 1300 जणांचा अंत; एसी, पंखे खरेदीसाठी लोकांची झुंबड
काही दिवसांपूर्वीच इटलीच्या ट्युरिन शहरात तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं. त्यामुळे जमिनीखाली टाकण्यात आलेल्या केबल गरम झाल्या. अनेकदा ब्लॅकआऊट झालं. वाढलेल्या उकाड्यामुळे विजेची मागणी कैकपटीनं वाढली आहे. त्यामुळे डेटा सेंटर्सला पुरेसा विद्युत पुरवठा होत नाही.

झ्युरिच इंश्युरन्सच्या अहवालानुसार, सध्याच्या घडीला जगातील ७९ टक्के डेटा सेंटर्ससमोर हवामानातील बदलांमुळे निर्माण झालेल्या संकटांचा धोका आहे. केवळ उकाड्यामुळेच नव्हे, तर सोसाट्याच्या वाऱ्यांमुळेही डेटा सेंटर्सचं नुकसान होतं. त्यामुळे टेक कंपन्यांसमोर मोठी आव्हानं उभी राहिली आहेत. यावर्षी ६४ टक्के कंपन्यांनी त्यांची डेटा सेंटर्स ग्रामीण भागात आणि दूरवर स्थलांतरित केली आहेत. पण या परिसरांमध्ये डेटा सेंटर्सना वेगळ्या धोक्यांचा सामना करावा लागत आहे. कुठे सोसाट्याचा वारा, गारांचा पाऊस यामुळे डेटा सेंटर्सचे कूलिंग टॉवर उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे डेटा सेंटर्स थंड ठेवणं अतिशय आव्हानात्मक आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा