Headlines

Ahilyabai Holkar Farmer Loan Waiver | शेतकऱ्यांनो, कर्जमाफीसाठी आणखी वाट पाहावी लागणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी माहिती


मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहीलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे.. राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आणखी वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता आहे.

ही प्रक्रिया पुढे ढकलण्यासंदर्भात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली आहे.. त्यांनी सांगीतले आहे की,केंद्र सरकारकडून काही महत्त्वाचा तांत्रिक डेटा मिळण्यास होत असलेल्या उशिरामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.. या कर्जमाफी योजनेसाठी पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची निश्चिती करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ‘इन्कम टॅक्स’ (आयकर) भरणाऱ्या शेतकऱ्यांचा डेटा मागवला आहे.

हा डेटा दिल्लीहून येण्यासाठी आणखी ५ ते ६ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून ही अधिकृत माहिती प्राप्त झाल्यानंतरच राज्य सरकारकडून या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली जाईल. त्यामुळे पुढील आठवड्यात तरी कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत