सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांतील निकृष्ट दर्जा, शहरातील खड्डे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी गुरुवारी नाशिक दौरा केला.
Nashik Crime : केमिकलमध्ये नोट टाकली, नंतर चपातीसारखी लाटली, नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त‘सिंहस्थ कामांचे पैसे कोणाच्या खिशात गेले? देशात चंदाचोरीवर प्रश्न विचारला, की लगेच हिंदूविरोधी ठरवले जाते. राम मंदिरासाठी आम्हीही दान दिले, लोकांनीही दान दिले; मग प्रश्न विचारायचा नाही का?’ असा सवाल ठाकरे यांनी केला. भाजप साधू-महंतांचा निवडणुकीत वापर करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘हा निर्णय प्रशासकीय नसून राजकीय आहे. त्यामुळे या सर्व कामांची श्वेतपत्रिका काढली पाहिजे,’ अशी मागणी ठाकरे यांनी केली. शहरातील खड्डे आणि सिंहस्थ कामांच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तर्फे सोमवारी, १७ ऑगस्टला मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘हा मोर्चा ताकदीचा असेल. नाशिककरांनी विचारधारा बाजूला ठेवून नाशिककर म्हणून एकत्र यावे आणि मोर्चात सहभागी व्हावे,’ असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना केले.
भाजप मोठा मासा
कुंभमेळा कामांतील कथित बनावट कार्यारंभ आदेशांच्या मुद्द्यावरूनही ठाकरे यांनी ‘बनावट कंत्राटदारांचे आदेश काढणारे छोटे मासे आहेत; भाजप हा मोठा मासा असून शहर गिळायला निघाला आहे,’ असा आरोप केला. मुंबईत मुख्यमंत्री आपल्या मित्रांना जमीन देत असल्याचा आरोप करीत, भाजपच्या एका आमदाराला १६ एकर जमीन देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. भाजपच्या एका आमदाराच्या साखर कारखान्याला १८ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल्याचा आरोप करीत, ‘स्पेशल केस म्हणून मुख्यमंत्र्यांनी नाशिकला निधी द्यावा,’ अशी मागणी ठाकरे यांनी केली.
Nashik FDA Action: नाशिकमध्ये FDAची मोठी कारवाई; भेसळीच्या संशयावरुन पावणेतीन लाखांचा तूप साठा जप्तनाशिकमध्ये ठेकेदारांचा धुमाकूळ
मुंबई-नाशिक महामार्गामुळे लॉजिस्टिक वाढेल, उद्योगांना चालना मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र चार वर्षांत परिस्थिती सुधारण्याऐवजी खड्डेच वाढले, असा आरोप ठाकरे यांनी केला. ‘समृद्धी महामार्गावरही चार वर्षांत पॅचवर्क सुरू आहे. नाशिकमधील डांबरी रस्ते खराब झाले आहेत. आधीचे रस्ते चांगले होते, असे नाशिककर सांगत आहेत. नाशिकमध्ये ठेकेदारांनी धुमाकूळ घातला आहे,’ असे ते म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले…
-मी पाहणीला जाणार असल्याचे कळताच काही रस्ते रात्रीतून दुरुस्त करण्यात आले. भाजपने नाशिककरांची अवस्था वाईट करून ठेवली आहे,’
-नाशिकसाठी सर्व नागरिकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत, चाकणप्रमाणेच नाशिकमधील उद्योगही स्थलांतरित होण्याची भीती
-खड्ड्यांच्या जबाबदारीवरून महापालिका आणि नाशिक कुंभमेळा प्राधिकरण एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचा आरोप

