Headlines

Adidas vs Puma: दोन भावांनी सुरू केला बुटाचा व्यवसाय; एका वादाने कायमचे वेगळे झाले अन् जन्माला आले अब्जावधी डॉलर्सचे कट्टर प्रतिस्पर्धी – adidas vs reebok story 2 brothers once start shoe business dispute gave rise to multi bullion dollar rivals

The Dassler Brothers Feud: पुमा आणि आदिदास या क्रीडा साहित्याच्या विश्वातील दोन दिग्गज कंपन्या आहेत. दोन जर्मन भावांनी या ब्रँडचा पाया घातला आणि तब्बल 30 वर्षे गाजवली. पण नंतर आपापसातील तीव्र स्पर्धेमुळे एकाच कुटुंबातील दोन भाऊ कायमचे वेगळे झाले आणि यामुळे जगातील दोन अब्जावधी डॉलर्स कट्टर प्रतिस्पर्धी ब्रँड – ADDIDAS आणि PUMA – जन्माला आले.

Adidas vs Puma Dassler Brothers Feud and Brand Success Story
Success Story: अनेक दशकापूर्वी बुटांच्या जगात मोठी क्रांती घडली. खेळाडूंची कामगिरी उंचावणारे बूट उपलब्ध करून देण्याचे श्रेय मोठ्या प्रमाणावर डॅसलर बंधूंना दिले जाते. आजच्या काळात जगभर, विशेषतः खेळाच्या क्षेत्रात Adidas आणि Puma स्पोर्ट्सवेअर क्षेत्रातील आघाडीचे ब्रँड आहेत. पण तुम्हाला माहित्येय का की एकाच कुटुंबातील दोन भावांनी या दिग्गज स्पोर्ट्स ब्रँडचा पाया घातलेला? दोघांनी 30 वर्षे एकच कंपनी चालवली आणि मग, त्यांच्यातील स्पर्धा इतकी तीव्र झाली की दोघे वेगळे झाले आणि याच स्पर्धेतून या दोन बलाढ्य, अब्जावधी डॉलर्स किमतीच्या कंपन्यांचा जन्म झाला.

दोन भावांनी सुरू केला बुटांचा व्यवसाय

दोन भावांनी सुरू केला बुटांचा व्यवसाय

19वे दशक जर्मनीच्या इतिहासाला वेगळं वळण देणारे ठरले. 1900 सालापर्यंत जर्मनी युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आणि अमेरिका व ब्रिटननंतर जगात तिसऱ्या क्रमांकावर होती. जर्मनी मोठ्या उद्योगांचे केंद्र बनलेले. याच देशात दोन भावांचा जन्म झाला, ज्यांनी एकत्र एक छोटाशा बुटाचा व्यवसाय सुरू केला आणि तब्बल 30 वर्ष एकत्र या क्षेत्रात नावलौकिकाला आले. नंतर भावांच्या समबंधात कटुता आली आणि दोघे कायमचे वेगळे झाले.

इथूनच सुरू झाला पिक्चर

इथूनच सुरू झाला पिक्चर

ॲडॉल्फ (आडी) डॅसलर आणि रुडॉल्फ डॅसलर या दोन भावंडांचे बालपण इतरांसारखेच होते, पण कदाचित नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीची आर्थिक परिस्थिती खालावली ॲडॉल्फ यांनी आपल्या घरात हाताने खेळाडूंसाठी बूट बनवायला सुरू केली. काही वर्षांनी भाऊ रुडॉल्फ देखील व्यवसायात सामील झाले. आडी बूट तयार करायचे, तर रुडॉल्फ विक्रीच काम करायचे आणि अशाप्रकारे, दोन भावांच्या मेहनतीच्या जोरावर व्यवसायात झपाट्याने वाढ झाली.

नावलौकाला कसे आले दोन भाऊ?

नावलौकाला कसे आले दोन भाऊ?

1936 च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये अमेरिकन धावपटू Jessie ओवेन्सने डॅसलर बंधूंचे बूट घालून चार सुवर्णपदके जिंकली आणि इथूनच त्यांच्या बुटांची जगभर चर्चा सुरू झाली. त्यानंतर झपाट्याने वाढ झाली आणि कंपनीचे नाव केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळखले जाऊ लागले.

दुसऱ्या महायुद्धाने खेळ बिघडवला

दुसऱ्या महायुद्धाने खेळ बिघडवला

1939 मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले ज्यामुळे कच्च्या मालाची, विशेषतः चामड्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. पण तरीही कंपनीने खेळाडूंसाठी बुटाचे उत्पादन सुरूच ठेवले. दुसऱ्या महायुद्धाची शेवटची दोन वर्षे शिल्लक असताना कारखाना बंद करून त्याचा शस्त्र निर्मितीसाठी करण्यासाठी वापर करण्याचे आदेश दिले गेले.

रुडीच्या लोभाने संघर्ष सुरू झाला

रुडीच्या लोभाने संघर्ष सुरू झाला

पण त्याच क्षणी रुडीचा लोभ वाढला आणि कंपनीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचं स्वप्न पाहू लागले. कुटुंबातील इतर सदस्य कंपनीचा भाग बनू नये म्हणून आपली बहीण मेरीच्या मुलांना कंपनीत नोकरी देण्यासही नकार दिला, ज्याचे परिणाम विनाशकारी ठरले. मेरीच्या दोन्ही मुलांना युद्धभूमीवर पाठवले गेले आणि मारले गेले. यामुळे कुटुंबात कलह निर्माण झाला आणि रुडी व आदीच्या पत्नींमध्ये भांडणे सुरू झाली.

भावांमध्ये निर्माण झाली हीन भावना

भावांमध्ये निर्माण झाली हीन भावना

त्यानंतर 1940 मध्ये आडी सैन्यात भरती झाले पण, लवकरच सेवेतून मुक्त केले गेले करा, त्यावेळी त्यांच्या कंपनीला त्यांची जास्त गरज होती. रुडीने पहिल्या महायुद्धात भाग घेल्यामुळे 1943 मध्ये युद्धावर पाठवले, ज्यामुळे संताप वाढला. आपल्याला युद्धभूमीवर पाठवण्यासाठी भाऊ जबाबदार आहे आणि यामुळे आडीला कंपनीवर पूर्ण नियंत्रण मिळेल, अशी भावना निर्माण झाली. 1943 पर्यंत जर्मनीमध्ये गेब्रूडर डॅसलर शुहफॅब्रिक ही एकमेव स्पोर्ट्स शूज बनवणारी कंपनी उरली होती.

रुडीचे वाईट दिवस सुरू झाले

रुडीचे वाईट दिवस सुरू झाले

शत्रूशी दोन हात करतानाही रुडीचे संपूर्ण लक्ष कारखान्यावर लागून होते. येथे त्याने रणनीती आखली. तुशिनच्या रणांगणावर असताना, आपल्या जागेवरून निसटला आणि हर्टझोगेनॉराखला परतला, पण नाझी गुप्तचर सेवेने त्याला अटक करून तुरुंगात टाकले. जोपर्यंत युद्ध चालू होते, तोपर्यंत रुडी तुरुंगात रागाने खदखदत होता तर दुसरीकडे, आदीच्या नेतृत्वात व्यवसायाची भरभराट झाली.

आदीने कंपनीत एकहाती वर्चस्व निर्माण केले

आदीने कंपनीत एकहाती वर्चस्व निर्माण केले

युद्ध संपले होते, पण रुडीची वेळ अजून गेली नव्हती. अमेरिकन्सनी नाझी पक्षाशी संबंधित शिक्षेची घोषणा केली आणि गुप्तचर सेवेशी संबंधाच्या संशयावरून अटक झालेल्या पहिल्या काही लोकांपैकी रुडी देखील होता. त्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला पण, आदीने नाझींशी संबंध असल्याचे कबूल केले आणि रुडीवरील खटला रद्द केला. त्याने आणखी एक वर्ष तुरुंगात घालवले आणि आदीने संपूर्ण व्यवसाय ताब्यात घेऊन आपली सत्ता आणखी वाढवली.

दुसऱ्या महायुद्धानंतर भाऊ विभक्त झाले

दुसऱ्या महायुद्धानंतर भाऊ विभक्त झाले

मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर दोन्ही भावांमध्ये मतभेद समोर येऊ लागले, ज्यामुळे दोघांनी अखेरीस 1948 मध्ये कायमचे वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आडी डॅसलर यांनी Adidas ची स्थापना केली, तर रुडॉल्फ यांनी Puma नावाचा स्वतंत्र ब्रँड सुरू केला. अशाप्रकारे, एकच घरात जांणलेले दोन ब्रँड एकमेकांचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी बनले.
आज Adidas आणि Puma जगातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स ब्रँडपैकी असले तरीही या दोघांचा किस्सा केवळ दोन कंपन्यांचा नाही तर स्वप्न, मेहनत, मतभेद आणि यश यांची प्रेरणादायी कहाणी आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा