Actor Rangnath Last Wish To Transfer All Property To House Help Name ; Actor Ranganath : टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी मोलकरणीच्या नावे 20 कोटींची संपत्ती करुन गेला अभिनेता, भिंतीवर लिहून ठेवलेली अखेरची इच्छा
Actor Rangnath Last Wish To Transfer All Property To House Help Name ; Actor Ranganath : टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी मोलकरणीच्या नावे 20 कोटींची संपत्ती करुन गेला अभिनेता, भिंतीवर लिहून ठेवलेली अखेरची इच्छा
Actor All Assets To House Maid : एका अभिनेत्याने त्याची संपूर्ण कोट्यवधीची संपत्ती मोलकरणीच्या नावे करुन जीव दिला होता. त्यांच्या मुलीने वडिलांच्या मृत्यूनंतर धक्कादायक खुलासा केला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातही अशा काही घटना घडतात. ज्या फिल्मी कथेपेक्षा कमी नसतात. तेलगू फिल्म इंडस्ट्रीतसुद्धा एका अभिनेत्याबाबत अशीच थक्क करणारी कथा समोर आली आहे. सुमारे 11 वर्षांपूर्वी, या क्षेत्रातील एका अत्यंत लोकप्रिय अभिनेत्याने आत्महत्या केली होती. या अभिनेत्याच्या एका अंतिम इच्छेने सर्वांनाच आश्चर्यचकित केले; असे म्हटले जाते की, मृत्यूपूर्वी त्याने एक मेसेज लिहून ठेवला होता, ज्यामध्ये त्याने आपली संपूर्ण मालमत्ता अशा व्यक्तीच्या नावे करण्याची इच्छा व्यक्त केली होती, जिचा कोणीही विचार केला नव्हता.
मिळालेल्या माहितीनुसार, हे मोठं पाऊल उचलण्यापूर्वी त्याने भिंतीवर काळ्या मार्करने एक चिठ्ठी लिहिली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपली मालमत्ता कुटुंबाच्या नावे करण्याऐवजी त्याने ती आपल्या घरकाम करणाऱ्या महिलेच्या नावे केली. आपल्या त्या अखेरच्या चिठ्ठीत त्याने लिहिले होते, “हे संपत्ती तिला द्या; तिला त्रास देऊ नका.”
त्या संध्याकाळी त्यांची मुलगी नीरजा त्यांना भेटायला गेली होती
अभिनेते रंगनाथ यांनी आपल्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 19 डिसेंबर 2015 रोजी वयाच्या 66 व्या वर्षी हैदराबादमधील त्यांच्या घरी त्यांनी आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, त्या संध्याकाळी त्यांची मुलगी नीरजा त्यांना भेटायला गेली होती. तिने भरपूरवेळा दरवाजा ठोठावला, परंतु त्यांनी दरवाजा न उघडल्यामुळे कुटुंबीयांनी तो दरवाजा तोडला आणि त्यांना आत जाऊन पाहिले.
त्यांनी एका मित्राला आपला शेवटचा मेसेज पाठवला होता
त्या काळातील वृत्तांवरून असे समजते की, रंगनाथ हे दीर्घकाळापासून डिप्रेशन आणि एकाकीपणाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनानंतर काही कटू वास्तव समोर आले; नंतर एका मुलाखतीत त्यांच्या मुलीने सांगितले की, त्यांनी यापूर्वी अनेकदा आत्महत्येचे विचार केले होते आणि त्यासाठी समुपदेशनही घेतले होते. रंगनाथ यांनी दुपारी 3.30 वाजता त्यांचे मित्र बी. देवदास यांना शेवटचा मेसेज पाठवला होता. या एसएमएसद्वारे त्यांनी ‘गुडबाय’ म्हटले होते.
त्यांनी आपल्या मालमत्तेचा तपशील चक्क भिंतीवर लिहून ठेवला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरी काम करणाऱ्या मीनाक्षी त्या दिवशी त्यांच्यासाठी जेवण बनवायला आल्या होत्या. आपले काम आटोपून निघून गेल्या होत्या. त्यावेळी मात्र, त्यांच्या आयुष्यात इतका मोठा कलाटणी देणारा क्षण येणार आहे, याची त्यांना कल्पनाही नव्हती; रंगनाथन यांनी आपली संपूर्ण मालमत्ता त्यांच्या नावे करण्याचा निर्णय घेतला होता, हे त्यांना माहीत नव्हते. रंगनाथन यांना हा निर्णय अंतिम ठेवायचा होता, म्हणूनच त्यांनी आपल्या मालमत्तेचा तपशील चक्क भिंतीवर लिहून ठेवला होता.
रंगनाथन यांची एकूण संपत्ती सुमारे 10 ते 20 कोटी रुपये
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मालमत्तेबाबतच्या या निर्णयामागील नेमके कारण कधीही अधिकृतपणे स्पष्ट झाले नाही. अहवालांनुसार, रंगनाथन यांची एकूण संपत्ती 10 ते 20 कोटी रुपयांच्या दरम्यान होती.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा