Chhatrapati Sambhajinagar Accident: अपघाताची माहिती मिळाल्यावर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी हायवाच्या चाकाखाली चिरडलेल्या मुलीला पाहून आई वडील व नातेवाईकांनी टाहो फोडला प्रत्यक्षदर्शींचे डोळ्यात अश्रू आले.

आरुषी शाळेच्या बसमधून उतरून रस्ता ओलांडत असताना अंबेलोहळकडून एमआयडीसीकडे येणाऱ्या विनानंबरच्या हायवाची धडक बसली. आरुषी हायवाच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता, तर तिला घेण्यासाठी आलेली तिची १६ वर्षीय बहीण नंदिनीही जखमी झाली. येथील श्री साई श्रद्धा इंडस्ट्रीज एकलहेरा शिवारातील गट नंबर २७ मध्ये उत्तर प्रदेश येथील कृष्णा तिवारी कुटुंबासह उपजीविकेसाठी आलेले आहेत. आरुषी विटावा येथील खासगी शाळेत दुसरीत शिकते.
Chhatrapati Sambhajinagar : पोलिसांची धडाकेबाज कारवाई, केवळ बस तिकीटाचा धागा पकडत दागिन्यांची पर्स शोधून काढलीअपघातानंतर परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर जमा झाले यावेळी जमावाने हायवावर दगडफेक केली. तसेच हायवाचालकाला पकडून बेदम मारहाण केली. जमावाच्या तावडीतून चालकाने सुटका करून हायवा ट्रक घटनास्थळी सोडून शेतातून पळ काढला. काही काळ परिसरात तणावाची परिस्थिती होती; तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. या वेळी घटनेची माहिती मिळाल्यावर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे, दुय्यम निरीक्षक संदीप राजपूत, वाहतुक शाखेचे निरिक्षक पवन चोधरी, उपनिरीक्षक सागर पाटील, फुलसिंग गुसिंगे, रावसाहेब काकड, शेख सलीम, अंमलदार बाळासाहेब आंधळे, किशोर साबळे आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
Amit Thackeray : आम्हाला आमच्याच लोकांनी फसवले, अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले?नागरिकांकडून दगडफेक
या वेळी मोठ्या प्रमाणावर जमलेल्या संतप्त नागरिकांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर दगडफेक करून प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला.

