जंतरमंतरवरील आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता कॉकरोच जनता पार्टीनं १५ ऑगस्टपासून स्कूल ठीक करो मोहिम हाती घेतलीये. या माध्यमातून सरकारी शाळांची परिस्थिती अभिजीत दिपके आणि त्यांच्या टीमनं देशभरातील सरकारी शाळांमध्ये जाऊन तिथलं वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केला. कुठे या मोहिमेचं कौतुक होतंय आणि सरकारवर ताशेरे ओढले जातायत तर कुठे कॉकरोच जनता पार्टीला रोषाला सामोरं जावं लागतंय. कॉकरोच जनता पार्टीचे सहसंयोजक यांच्यावर आशुतोष रांका यांच्यावर जयपूरमध्ये हल्ला झाला त्यानंतर त्यांच्यावर FIR दाखल करण्यात आली. आणि आता महाराष्ट्रातल्या शाळांची विदारक परिस्थिती दाखवणाऱ्या अभिजीत दिपके यांच्यावरही लातूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नक्की काय घडलं? पोलिसांनी कोणती गंभीर कलमे लावली आहेत? दिपके यांना अटक होणार का? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया…