Headlines

Vasai-Virar News: पूरमुक्तीसाठी हवेत १०० कोटी! वसई-विरार महापालिका-रेल्वेच्या संयुक्त बैठकीत महापौरांचा प्रस्ताव – mayor proposes rs 100 crore for flood control at joint meeting of vasai-virar municipality and railways


Vasai-Virar News: ​​महापौर अजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत पूरनियंत्रणासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

vasai virar
वसई-विरार(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, वसई: गेल्या आठवड्यात वसई-विरारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिका आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त बैठक नुकतीच पालिका मुख्यालयात पार पडली.

‘महापालिका दरवर्षी नालेसफाईवर कोट्यवधी रुपये खर्च करत असली, तरी पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची समस्या कायम आहे. त्यामुळे केवळ नालेसफाईवर भर न देता पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी १०० कोटी रुपयांची विशेष तरतूद करून दीर्घकालीन आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. असे यावेळी महापौर अजीव पाटील यांनी सांगितले. तसेच शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक जाणकारांकडून नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाचे जुने मार्ग समजून घेऊन त्यानुसार उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

Maharashtra TimesVirar News: पोलिसांनी समजावलं, तरीही चार मुलं समुद्रात उतरली; दोघांना वाचवण्यात यश, दोघे बेपत्ता!
पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहण्यासाठी आवश्यक ठिकाणी संबंधित विभागाची परवानगी घेऊन अडथळे दूर करावेत. तसेच ज्या ठिकाणी जुने पाण्याचे मार्ग बंद झाले आहेत, तेथे स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी समन्वय साधून ते मार्ग खुले करण्याचा किंवा आवश्यकतेनुसार नवीन नाले उभारण्याचा पर्यायही विचारात घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

महापौरांनी रेल्वे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधताना शहरातील पूरस्थितीस रेल्वे हद्दीतील नाले आणि कल्व्हर्टची अपुरी सफाईही कारणीभूत ठरत असल्याचे नमूद केले. शहरातील मुख्य नाले खाडीमुखापासून उगमस्थानापर्यंत टप्प्याटप्प्याने रुंद करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. रेल्वे हद्दीतील नालेसफाईसाठी परवानगी प्रक्रियेमुळे अडथळे निर्माण होत असल्याने अनेक ठिकाणी गाळ साचतो आणि पाणी तुंबते, असेही त्यांनी सांगितले.

Maharashtra TimesPalghar News: वाढवण बंदराजवळ आंतरराष्ट्रीय बाजार, दापचारीमध्ये कृषी व्यापार केंद्र उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय
रेल्वे मार्ग रुंदीकरण आणि फलाट उभारणीच्या कामांमुळे काही नैसर्गिक नाले अरुंद झाल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यामुळे शहरासह रेल्वे वाहतुकीलाही फटका बसत असल्याने रेल्वे प्रशासनाने आपल्या हद्दीत नवीन गटारे आणि नाले उभारण्याची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत, अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली.

या बैठकीला रेल्वे विभागाचे अधिकारी, महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, शहर अभियंता प्रदीप पाचंगे, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, सभागृह नेते प्रफुल्ल साने, उपमहापौर मार्शल लोपीस यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा