Ramraksha Vs Hanuman Chalisa: ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला नवनीत राणा हनुमान चालीसानं उत्तर देणार. अमरावतीत राणाचं हनुमान चालीसा आंदोलन. १८ जुलैला मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड आणि संघभूमीत ठाकरे सेनेचं आंदोलन होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानाजवळ असलेल्या रामनगरच्या श्रीराम मंदिरात शनिवारी उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहेत. मात्र, या आंदोलनावरून भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. हनुमान गढीच्या नरेशाचा हा चमत्कार आहे, म्हणूनच ठाकरेंना रामरक्षा पठण करण्याची सद्बुद्धी सुचली, असा टोला त्यांनी लगावला.
Farmers Death: सहा महिन्यांत 415 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; अमरावती विभागात संकट गहिरे, यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक घटना
नवनीत राणा यांनी ठाकरेंवर निशाणा साधताना जुन्या संघर्षाची आठवण करून दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘श्री हनुमान चालीसा पठणाला विरोध करणाऱ्या उद्धवा, कसा होतास तू आणि कसा झालास तू! अखेर अहंकाराची शिक्षा मिळाली आणि आता श्री रामरक्षा आठवली. सत्ता गेली, पक्ष गेला, आमदार-खासदारही गेले आणि बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचारही सुटले’, असा टोलाही लगावला आहे.
Bacchu Kadu: कंपन्यांना सरळ करा, अन्यथा कार्यालये पेटवू; बोगस बियाण्यांवरुन बच्चू कडूंचा इशारा
जुन्या वादाला फुटले तोंड
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी ठाकरेंचे निवासस्थान ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा केली होती. त्यावेळी शिवसैनिकांनी त्याला तीव्र विरोध केला होता. या वादानंतर राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन त्यांना २३ एप्रिल २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. १४ दिवस तुरुंगात घालवावे लागल्याची आठवण करून देत, केवळ हनुमान चालीसा वाचणार म्हणून आमच्यावर राजद्रोह लावणाऱ्यांना आज स्वतः रामरक्षा वाचायला लागत आहे, अशी टीका राणा यांनी केली.

