Headlines

IMF Warning on Fuel Shortage; तिकडे होर्मुझमध्ये जहाजांच्या रांगा, इकडे ‘सेफ्टी बफर’ रिकामा; IMF ने म्हटले जागतिक बाजार मोठ्या वादळाच्या उंबरठ्यावर


Economic Crisis: तुमच्या किचनमधील शिधा संपायला लागला तर काय होईल? अशीच काही परिस्थिती सध्या जागतिक बाजारावर ओढवली आहे. IMF ने तेलाबाबत जगाला हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या घरी प्रत्येक महिन्याला 50 किलो गहू येतात, पण बाजारात अचानक गव्हाचा पुरवठा थांबला. तर अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल?

तुम्ही घरात ठेवलेला जुना गहू वापराल, मग कदाचित तुम्ही थोडे कमी खायला लागाल. शेजाऱ्याकडे जास्तीचा शिधा असेल, तर त्याचाही काही दिवसांसाठी उपयोग होईल, पण विचार करा की काही महिन्यांनंतर पुन्हा तेच संकट आले आणि यावेळी घरात शिधा शिल्लक नसेल, शेजाऱ्याकडेही जास्तीचे धान्य नसेल आणि बाजारातही पुरवठा कमी असेल, तर काय होईल? सध्या जागतिक कच्च्या तेलाच्या बाजाराची स्थिती अशीच आहे.

Maharashtra TimesGold Silver Rate Fall: युद्धाच्या सावटात सुवर्णबाजारात घसरणीचा ट्रेंड; सोनं-चांदी पुन्हा स्वस्त; मौका की धोका? गुंतवणूकदार संभ्रमात

IMF ने तेलाबद्दल दिला इशारा

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले की, पश्चिम आशियातील अमेरिका-इराण तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदीमुळे निर्माण झालेल्या पहिल्या तेल संकटाचा धक्का जगाने कसाबसा पचवला, पण आता परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. जगातील अतिरिक्त तेल, अतिरिक्त उत्पादन आणि आपत्कालीन साठ्याचा मोठा भाग आधीच वापरला गेला असून भविष्यात तेलाच्या पुरवठ्यात पुन्हा अडथळा आल्यास त्याचा आणखी मोठा धक्का बसू शकतो आणि अनेक देश हा धक्का पचवू शकणार नाही.

Maharashtra Timesकोट्यवधी नोकरदारांची प्रतीक्षा संपली; EPFO कडून 8.25 टक्के व्याज जमा होण्यास सुरुवात; तुमच्या खात्यात पैसे आले का? पाहा कसा करायचा बॅलन्स चेक

जागतिक अर्थव्यवस्थेबाबत IMF चा इशारा

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा सर्वाधिक परिणाम जगाला मोठ्या प्रमाणात तेलाचा पुरवठा करणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीवर झाला आहे. पश्चिम आशियात तणाव वाढल्यामुळे या जलमार्गावरून होणाऱ्या तेलाच्या पुरवठ्यावर झाला असून या दरम्यान, IMF ने सांगितले की यामुळे दररोज अंदाजे 2 कोटी बॅरलतेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आणि अशा प्रकारची मोठी टंचाई कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करू शकते.

Maharashtra TimesMultibagger Stock : लखपतींचे नशीब पालटणारा स्टॉक; 3 वर्षांतला परतावा पाहून गुंतवणूकदारांचे डोळे चक्रावले; कंडोम कंपनीवर वाढला विश्वास

तेलाच्या संकटातून जग वाचलं कसं?

अशा परिस्थितीत, प्रश्न निर्माण होतो की युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसात निर्माण झालेल्या तेल संकटातून जग वाचलं कसं? जगाला कोणी वाचवलं? आयएमएफनुसार, तीन घटकांनी जगाला एवढ्या मोठ्या संकटातून सावरले.

  • तेलाचा कमी वापर

​तेलाची किंमत वाढू लागल्यावर अनेक देशांनी ऑइलचा वापर कमी करण्यास सुरुवात केली, विशेषतः अनेक आशियाई देशांनी वीज निर्मितीसाठी कोळसा आणि इतर ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवला. तसेच लोकांना तेलाची बचत करण्यास भाग पडले.

  • इतर देशांनी अधिक तेलाचे उत्पादन वाढवले

आखाती देशांकडून तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्यास अमेरिका, रशिया, व्हेनेझुएला आणि गयाना यांसारख्या देशांनी तेलाचे उत्पादन वाढवले. IMF ने म्हटले की या देशांनी एकत्र दररोज सुमारे 20 लाख बॅरल अतिरिक्त तेल बाजाराला पुरवले, ज्यामुळे पुरवठा पूर्णपणे सुधारला नाही तरीही निश्चितच परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून रोखले.

  • अशाप्रकारे, जगातील आता जुन्या तेलाचा साठा संपला आहे. प्रत्येक देश भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीसाठी काही तेल राखून ठेवतो, ज्याला आपत्कालीन साठा म्हणतात. बाजारात तेल टंचाई निर्माण झाल्यावर अनेक देशांनी आपला जमा केलेला साठा वापरण्यास सुरुवात केली. यामुळे जगाने भविष्यासाठी बचत केलेले सगळं तेल वापरून संपवले.

IMF ला नेमकी कशाची भीती?

अशाप्रकारे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला हीच भीती सतावू लागली आहे. पहिल्या संकट काळात जगाला वाचवणारे वरील 3 घटक आता कमजोर झाले असून अतिरिक्त तेल उत्पादन आधीच वाढवले आणि लोकांनी शक्य तितके तेल मोठ्या प्रमाणावर वाचवले. तसेच राष्ट्रीय तेलसाठे आधीच संपले असून उद्या पुन्हा पुरवठा पूर्णपणे थांबल्यास जगाकडे पूर्वीसारखे बचत वापरण्याचा पर्याय राहणार नाही.

अशा परिस्थितीत IMF ने सांगितले की देशांनी केवळ सध्याच्या संकटावरच नव्हे, तर भविष्याच्या तयारीवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. रिकामे झालेले तेलसाठे पुन्हा भरले पाहिजे, ऊर्जेचे इतर स्रोतही बळकट केले पाहिजे. याशिवाय, केवळ एकाच प्रदेशावर अवलंबून राहण्याऐवजी विविध देशांकडून तेल खरेदी करण्याचे धोरण विकसित केले पाहिजे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत