Headlines

goregaon nesco concert youth drug overdose case lab findings on worli incident; ‘म्युझिक कॉन्सर्ट’मधील तरुणाचा ड्रग्जनेच गेलेला जीव; वरळीतील घटनेबाबत प्रयोगशाळेचा निष्कर्ष


Mumbai Concert Drug Overdose Case: या घटनेनंतर ताडदेव पोलिसांनी सुमारे २०हून अधिक जणांचे जबाब नोंदवले. रुशील याच्यासोबत सहभागी झालेल्या त्याच्या मित्राच्या जबाबाचाही यामध्ये समावेश आहे.

mumbai concert
mumbai concert(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : वरळीच्या ‘एनएससीआय डोम’ येथील ‘म्युझिक कॉन्सर्ट’मधील तरुणाचा मृत्यू ड्रग्जसेवनाने झाल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून निष्पन्न झाले आहे. त्याच्या शरीरात ‘ एमडीएमए ’ हे ड्रग्ज आढळल्याचे स्पष्ट झाले. गोरेगावच्या नेस्को सेंटरनंतर आता वरळी डोममधील ‘ म्युझिक कॉन्सर्ट ’मध्येही ड्रग्जसेवन करण्यात आल्याचे समोर आल्याने मुंबईत होणाऱ्या संगीत कार्यक्रमांतील सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वरळी डोममध्ये ६ जून रोजी ‘स्पेस बाउंड’च्या वतीने ‘क्लांगकुएन्स्टलर ऑल नाइट एल’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सुमारे सहा हजार प्रेक्षकांनी गर्दी केली होती. वकिलीचे शिक्षण घेतलेला रुशील गांगुर्डे ( वय २८) हा आपल्या मित्रांसह त्यात सहभागी झाला होता. रात्री साडेनऊच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला रुग्णवाहिकेतून ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले . तिथे दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Maharashtra TimesNCP नेते फडणवीसांना ‘वर्षा’वर भेटले, पण पार्थ-सुनेत्रा पवारांना कल्पनाही नव्हती; तटकरेंना ‘देवगिरी’वर बोलावणं, गैरसमजाचं कारण
‘ म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये सहा हजारांपेक्षा अधिक प्रेक्षकांनी गर्दी केली होती. वरळी डोमची क्षमता बऱ्यापैकी मोठी असली, तरी गर्दीच्या तुलनेत वातानुकूलित यंत्रणा, तसेच इतर आवश्यक असलेल्या उपाययोजना आयोजकांनी केल्या नव्हत्या, असे दिसून आल्याने आयोजकांविरुद्ध निष्काळजीने मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला.

कोंदट वातावरणामुळे रुशील याचा जीव गुदमरल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये दिसून आले होते. मात्र , त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. यामध्ये रुशीलच्या शरीरात ‘एमडीएमए’ हे ड्रग्ज आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे . या अहवालामुळे पोलिसांना या प्रकरणाच्या तपासाची दिशा बदलावी लागणार आहे , हे स्पष्ट झाले आहे.

Maharashtra TimesDelimitation Bill: …तर आम्ही 24 तासांत भूमिका मांडू! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत खासदार सुप्रिया सुळेंचं सूचक विधान
ड्रग्जसाखळी शोधणार
रुशीलचा मृत्यू ड्रग्जमुळे झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्याचे चार-पाच मित्र , आयोजक, प्रत्यक्षदर्शी यांचे पुन्हा जबाब नोंदविण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही फूटेजचीही पडताळणी केली जाणार असून , ड्रग्जची साखळी शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा