बांदा : माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय विद्यमान आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवस सप्ताहाचे औचित्य साधून इन्सुली येथे रविवारी १९ रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबिर आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे आणि मित्रमंडळाच्या वतीने हा शिबीर आयोजित केला आहे. रविवार दिनांक १९ जुलै रोजी इन्सुली येथील नूतन माध्यमिक विद्यालयात सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत होणार आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य व गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने तज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून रुग्णांच्या डोळ्यांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. शिबिरादरम्यान मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा गरजूनी लाभ घ्यावा असे आवाहन नारायण उर्फ बबन राणे मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
