Headlines

सोनम वांगचुक यांना राज ठाकरेंचा पाठिंबा; भाजपविरोधात मनसे मैदानात – raj thackeray stands with sonam wangchuk, slams bjp



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. वांगचुक यांच्या आमरण उपोषणाचा आज 19 वा दिवस आहे. महाराष्ट्रातूनही त्यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असतानाच आता स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा मैदानात उतरले आहेत. आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आलाय, असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागलंय. वांगचुक यांच्या तब्येतीची दृश्य काळजीत टाकणारी असल्याचं त्यांनी म्हटलं. सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवलाय याचं प्रचंड वाईट वाटतंय, असंही राज ठाकरेंनी म्हटलं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत