Dhurbe Elephant in Nepal kills Family : शोकाकुल बोटे कुटुंबाने पुढील धोका टाळण्याच्या इराद्याने नदी ओलांडून सुमारे नऊ मैल दूर असलेल्या ठिकाणी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. वर्षामागून वर्ष उलटत गेली, तसं आपण वाचलो आहोत, असा समज त्या कुटुंबाने मनोमन करुन घेतला. पण जुलै महिन्याच्या सुरुवातीला, पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात संकटाची चाहूल लागली.

शनीचारा बोटे यांच्या कुटुंबावरील या भयानक संकटाला डिसेंबर २०१२ मध्ये सुरुवात झाली. ‘धुर्बे’ नावाच्या या हिंसक हत्तीने नेपाळमधील चितवन राष्ट्रीय उद्यानाजवळ असलेल्या माडी या शहरात त्यांच्या आई-वडिलांना तुडवून ठार मारले होते. ‘काठमांडू पोस्ट’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
घर बदललं, नदी ओलांडली
शोकाकुल शनीचारा यांनी पुढील धोका टाळण्याच्या इराद्याने आपल्या कुटुंबाला घेऊन राप्ती नदी ओलांडून सुमारे नऊ मैल दूर असलेल्या जगतपूरमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. वर्षामागून वर्ष उलटत गेली, तसं आपण वाचलो आहोत, असा समज त्या कुटुंबाने मनोमन करुन घेतला. पण जुलै महिन्याच्या सुरुवातीला, पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात संकटाची चाहूल लागली.
जगतपूरमधील बोटे कुटुंबाच्या घरात धुर्बे हत्तीने शिरकाव केला. त्यांची २५ वर्षांची सून आशिका बोटे आणि चार वर्षांचा नातू भरत बोटे यांचा जीव घेतला.
Mother Son Reunion : आई आता जिवंत नसावी, घर सोडलेल्या माऊलीबद्दल लेकराचा समज, अडीच वर्षांनी चमत्कारिक भेट, मायलेकाला अश्रू अनावर
शोकाकुल कुटुंबाची प्रतिक्रिया
“मोठ्या नद्या ओलांडून पलिकडे गेल्याने आम्ही सुरक्षित राहू, असे आम्हाला वाटले होते. पण इतक्या वर्षांनंतर त्याच हत्तीने आम्हाला पुन्हा शोधून काढले. त्याने आमच्या घरावर हल्ला केला आणि माझ्या सुनेला आणि लहान नातवाला जीवे मारला. आता आमच्याकडे पळून जाण्यासाठी दुसरी कोणतीही जागा उरलेली नाही” असे बोटे यांनी ‘काठमांडू पोस्ट’ला सांगितले. या ताज्या हल्ल्यामुळे गेल्या १४ वर्षांच्या कालावधीत एकाच हत्तीच्या हल्ल्यात बोटे यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचा बळी गेल्याचे दिसते.
अत्यंत हिंसक हत्ती
‘धुर्बे’ हा नेपाळमधील अत्यंत कुख्यात आणि हिंसक हत्तींपैकी एक असून, गेल्या काही वर्षांत झालेल्या अनेक जीवघेण्या हल्ल्यांशी त्याचा संबंध जोडला गेला आहे. चितवन राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१० पासून आतापर्यंत या हत्तीमुळे २५ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे.
पवारांची राष्ट्रवादी फुटणार? फडणवीस-जयंतरावांमध्ये खलबतं; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
“या दुर्दैवी घटनेपूर्वी ‘धुर्बे’मुळे २३ जणांचा बळी गेला होता” अशी माहिती चितवन राष्ट्रीय उद्यानाचे प्रतिनिधी अविनाश थापा मगर यांनी ‘काठमांडू पोस्ट’ला दिली.
विकीपीडिया पेजवरही उल्लेख
“जगतपूरमधील या ताज्या दोन बळींच्या घटनेनंतर, केवळ या एकाच हत्तीमुळे मृत्यू झालेल्यांची निश्चित संख्या आता २५ वर पोहोचली आहे,” असेही त्यांनी नमूद केले. धुर्बेच्या नावाचे एक विकिपीडिया पानही उपलब्ध आहे, ज्यामध्ये त्याने बळी घेतलेल्या त्या २५ जणांचा तपशील दिलेला आहे.
Crime News : तुझे आंघोळीचे व्हिडिओ टाकू का; कॉलेज विद्यार्थ्याची तीन मुलांच्या आईवर वारंवार बळजबरी, अखेर जोडप्याचा ‘क्राईम पेट्रोल’ स्टाईल तोडगा
संभाव्य हल्ल्यांचा धोका कमी करण्याच्या उद्देशाने वन्यजीव अधिकाऱ्यांनी अनेक वर्षांपासून ‘धुर्बे’वर लक्ष ठेवले आहे. २०१६ मध्ये तो पुन्हा दिसून आला तेव्हा त्याच्या गळ्यात ट्रॅकिंग कॉलर बसवण्यात आली. मूळ कॉलर काम करणे थांबवल्यानंतर २०२० मध्ये नवीन कॉलर बसवण्यात आली आणि त्यानंतर २०२३ मध्ये ती पुन्हा बदलण्यात आली.

