Headlines

Sangli Krishna River Swami Samarth Math Killed Youth Over Dominance Dispute; एकेकाळी कट्टर मित्र, किरकोळ वादातून दोघेही दुरावले, शहरात वर्चस्वाच्या कारणावरुन रस्सीखेच; कृष्णा नदीच्या काठावर एकाला संपवलं


Sangli Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Sangli Crime News
सांगली चेतन तोरणे मर्डर(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगलीतील कृष्णा नदी काठावरील श्री स्वामी समर्थ घाटाजवळ वर्चस्ववाद आणि पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी सपासप वार करत निर्घृणपणे खून करण्यात आला. काल मंगळवारी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान ही घटना घडली. गुंड लखन इसरडे याच्यासह त्याच्या तीन ते चार साथीदारांनी हा खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचं काम सुरु होतं.

नदीकाठी बसला असताना हल्ला

चेतन तोरणे (वय 19, रा. टिम्बर एरिया वसाहत, सांगली) असं मृत तरुणाचं नाव आहे. संशयित इसरडे आणि मृत चेतन तोरणे एकेकाळी मित्र होते. त्यांच्यात किरकोळ वाद झाल्यानंतर तोरणे त्याची टोळी बनवत होता. त्यावेळपासून त्यांच्यात वर्चस्ववादातून सतत वाद होत होते. काल मंगळवारी सायंकाळी चेतन श्री स्वामी समर्थ घाट परिसरात बसला होता. त्यावेळी संशयित तीन ते चारजण तेथे आले. ते आपला गेम करण्यासाठी आल्याचं लक्षात आल्यावर चेतनने नदीच्या काठाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयितानी त्याचा पाठलाग करत त्याच्यावर कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी वार केले. त्यातील एक वर्मी घाव चेतनच्या डोक्यात बसल्याने तो तेथेच कोसळला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहून हल्लेखोर तेथून फरार झाले.
Maharashtra TimesMumbai AC Local: एसी लोकल दररोज विलंबाने, जादा भाडं भरूनही प्रवाशांचे हाल; तिकीटाच्या एका तासाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह

नेमकं कारण काय?

खुनाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे, शहराचे निरीक्षक अरुण सुगावकर पथकासह घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केल्यावर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला. या खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीय. लखन इसरडे याचा यात सहभाग आहे का? हेही अस्पष्ट आहे. काही हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके पाठवण्यात आल्याचे एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितलं.
Maharashtra TimesHeramb Karmarkar : होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात पुणेकर तरुणाने प्राण गमावले, मरीन इंजिनिअर हेरंब करमरकर यांचा करुण अंत

कृष्णा नदीत वृद्धावर मगरीचा जीवघेणा हल्ला

सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर मगरीने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जालिंदर शामराव साळुंखे (वय 61) हे मगरीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. साळुंखे नेहमीप्रमाणे शहरातील माई घाट येथे कृष्णा नदीत पोहत असताना मगरीने त्यांच्यावर हल्ला केला, मगरीच्या हल्ल्यानंतर भेदरलेल्या साळुंखेंनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी नदी धाव घेत मगरीच्या तावडीतून सुटका केली आहे. त्यामुळे साळुंखे हे बालंबाल बचावले आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा